मिरजेत डॉ. आमणापुरे हॉस्पिटलची तोडफोड
मिरज :
अतिगंभीर बालकाला रुग्णालयात आणल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर वेळेत आले नसल्याचा आरोप करत मृत बालकाच्या संतप्त नातेवाईकांनी शहरातील बालरोगतज्ञ डॉ. प्रकाश आमणापुरे यांच्या स्वप्निल बाल ऊग्णालयाची तोडफोड केली. तसेच डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ कऊन मारहाण केली. गुऊवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घटना घडली. तोडफोडीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. याप्रकरणी डॉ. प्रकाश आमणापूरे यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित मुस्ताक शेखसह त्याच्या अन्य चार नातेवाईकांविऊध्द गुन्हा दाखल झाला आहे. ज्येष्ठ डॉक्टरावरील या हल्ल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केला आहे. दोषींवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित मुस्ताक शेख यांच्या एक वर्षाच्या मुलीला गंभीर ताप आल्याने गुरूवारी रात्रीनंतर तिला छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यालगत असलेल्या डॉ. प्रकाश आमणापुरे यांच्या स्वप्निल बाल ऊग्णालयात आणले. रात्रीची वेळ असल्याने डॉक्टरही नव्हते. कर्मचाऱ्यांनी बालकाच्या प्रकृतीची माfिहती दिल्यानंतर डॉ. आमणापुरे हे काही वेळानंतर ऊग्णालयात पोहोचले. त्यांनी बालकाची तपासणी केली असता बालक मृत झाल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी मृत बालकाच्या नातेवाईकांनाही माहिती दिली.
त्यानंतर संशयीत मुस्ताकने अन्य नातेवाईकांना ऊग्णालयात बोलावून घेतले. डॉक्टर वेळेत न आल्याने मुलीवर वेळेत उपचार झाले नाहीत. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला असा आरोप करत ऊग्णालयात धिंगाणा घातला. टेबल, खुर्च्या व काचेच्या दरवाजाची तोडफोड केली. अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर डॉ. आमणापूरे यांनाही अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. डॉक्टरांनी गांधी चौकी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाई&कांची समजूत काढली.
दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ. आमणापुरे यांनी घडलेला सर्व प्रकार इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रविकांत पाटील यांना सांगितला. त्यानंतर आयएमएच्या सर्व डॉक्टरांनी गांधी चौकी पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन तक्रार दिली. रात्रीच्यावेळी डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नव्हते. बालकाला अधिकृतपणे अॅडमिटही केले नव्हते. उपचारापूर्वीच बालकाचा मृत्यू झाला असताना नातेवाई&कांनी डॉक्टरांवर रोष व्यक्त करणे चुकीचे आहे. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञांवर हल्ला कऊन हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्या सर्व संशयितांवर वैद्यकीय कायद्यानुसार कडक कारवाई करावी, अशी मागणी करत तक्रार दाखल केली. सदर तक्रारीनुसार मृत बालकाचे नातेवाईक असलेल्या मुस्ताक शेखसह अन्य चार नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्य रुग्णही भयभीत
डॉ.आमणापूरे यांच्या हॉस्पिटलमध्ये आंतरऊग्ण विभागात यापूर्वीच काही महिला ऊग्ण उपचारासाठी दाखल होत्या. रात्रीच्या सुमारास सर्व ऊग्ण झोपलेले असताना अचानक दंगा आणि आदळआपट सुरू झाली. त्यामुळे अन्य ऊग्णांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. मृत बालकाच्या महिला नातेवाईकांनीही आक्रोष करत दंगा घातला. त्यामुळे ऊग्णालय परिसरातील अन्य रहिवाशीही जागे झाले. रात्रीच्यावेळी ऊग्णालयाबाहेर बघ्यांची गर्दी झाली.
तपासण्यापूर्वीच बालकाचा मृत्यू
बालकाच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन मी तातडीने ऊग्णालयात पोहोचलो होतो. बालकाला अधिकृत अॅडमिटही केले नव्हते. तरीही तपासणी केली. मात्र, बालकाचा तपासणीपूर्वीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला नाही. तोडफोड आणि मारहाणीमुळे मला आर्थिक व मानसिक त्रास झाला.
डॉ. प्रकाश आमणापूरे, बालरोग तज्ञ
वैद्यकीय कायद्यानुसार कारवाई व्हावी
वैद्यकीय पंढरी असणाऱ्या मिरज शहरात ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञांवर हल्ला होऊन ऊग्णालयाची तोडफोड होते, ही निंदनीय घटना आहे. पोलिसांनी 2010 च्या सुधारीत वैद्यकीय कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. डॉ.आमणापूरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल कऊन कडक कारवाई करावी. अन्यथा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून सर्व डॉक्टर रस्त्यावर उतऊन आंदोलन करतील.
डॉ.रविकांत पाटील, आयएमए-अध्यक्ष