डीपी वर्ल्डने रेवाडी टर्मिनलचा केला विस्तार
06:02 AM Dec 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
दुबई येथील जागतिक शिपिंग कंपनी डीपी वर्ल्डने हरियाणातील पाली रेल्वे टर्मिनल येथे पायाभूत सुविधा सेवांचा विस्तार केला आहे. या क्रमाने, उत्तर भारताच्या मालवाहतुकीची मागणी पूर्ण करण्यासाठी तिसरा रेल्वे मार्ग जोडण्यात आला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या विस्तारामुळे पाली-रेवाडी रेल्वे टर्मिनलची मालवाहतूक क्षमता मासिक आधारावर 25 टक्क्यांनी वाढेल. यामुळे सध्याची क्षमता 192 गाड्यांवरून 240 गाड्यांपर्यंत वाढेल. डीपी वर्ल्ड ही देशातील सर्वात मोठी लॉजिस्टीक्स, बंदर मालवाहतुक क्षेत्रातील कंपनी आहे. ही सध्या देशात धोरणात्मकदृष्ट्या स्थित सात रेल्वे आणि अंतर्देशीय टर्मिनल चालवते आणि भारतीय रेल्वेच्या विस्तृत नेटवर्कशी जोडली असल्याची माहिती आहे.
Advertisement
Advertisement