महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बॅडमिंटन स्पर्धेत डीपी, हेरवाडकर विजेते

10:14 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व तात्या साहेब मुसळे माध्यमिक स्कूल आयोजित टिळकवाडी विभागीय माध्यमिक सटल बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात एमव्ही. हेरवाडकरने केएलएस संघाचा 2-1 अशा सेटमध्ये तर मुलींच्या गटात डी. पी संघाने हेरवाडकर संघाचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. ओरिएंटल स्कूलच्या तुकाराम सभाग़ृहात घेण्यात आलेल्या शटल बॅडमिंटन स्पर्धेत मुलान मध्ये 6 संघानी तर मुलीन मध्ये 7 संघानी भाग घेतला होता. या स्पर्धांचे उद्घाटन तान्यासाहेब मुसळे स्कुलच्या मुख्याध्यापिका शिला करडी, स्पर्धा सचिव अनुराधा जाधव, सिल्वीया डिलीमा, उमेश मजुकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केएलएसने डी. टी. देसाईचा 21-12, 21-17 अशा गुण फरकाने तल दुसऱ्या सामन्यात हेरवाडकरने सरकारी स्कूल 14 संघाचा 21-18, 21-13 अशा गुण परकाने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तनुश मुतगेकरने केएलउसच्या तेजस बेळगावकरचा 21-18, 17-21, 21- 18 अशा गुण फरकाने पराभव केंला. तर दुहेरीत तनुश व आरव बागी या जोडीने तेजस व तनय गिरी या जोडीचा 21- 18, 20-19 गुण फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या विभागात पहिल्या उपांत्य फेरीत डीपीने सरकारी स्कूल 14 चा 2-0 तर हेरवाडकरने केएलएसचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पल्हिल्या एकेरीत तनिष्का कोरीशेट्टीने हेरवाडकरच्या इराचा 21-10, 21-16 अशा गुण फरकाने तर दुहेरीत तनिष्का व मिचल या जोडीने इरा व भावना या जोडीचा 21-12, 21-10 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेसाठी पंच म्हणुन सिल्वीया डिलीमा, उमेश मजुकर यांनी काम पाहिले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article