For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवारी शेअर बाजारात घसरणीचा कल

06:28 AM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंगळवारी शेअर बाजारात घसरणीचा कल
Advertisement

सेन्सेक्स 893 अंकांनी कोसळला, निफ्टीतही 278 अंकांची घसरण, आशियाई बाजारात विक्रीने दबाव

Advertisement

आशियाई बाजारामध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आल्याने त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारात पहायला मिळाले. सेन्सेक्स 893 अंकांनी आणि निफ्टी 278 अंकांनी कोसळला होता. आयटी आणि मेटल हे दोन निर्देशांक दोन ते तीन टक्के इतके सर्वाधिक घसरणीत राहिले होते.

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 893 अंकांनी कोसळत 76200 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 278 अंकांच्या नुकसानीसोबत 23824 अंकांनी बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांकदेखील मंगळवारी पडझडीत राहिला होता. हा निर्देशांक 751 अंकांनी घसरत 57183 च्या स्तरावर बंद झाला. आयटी निर्देशांकदेखील मोठ्या प्रमाणात खाली आला होता. 616 अंकांच्या कमकुवततेसोबत आयटी निर्देशांक 27012 अंकांवर बंद होताना दिसला. निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक एक टक्का आणि निफ्टी स्मॉलकॅप-100 निर्देशांक अंदाजे अर्धा टक्का घसरणीसोबत बंद झाला.

मेटल, आयटीची घसरण

विविध क्षेत्रांची कामगिरी पाहिल्यास आयटी आणि मेटल हे दोन निर्देशांक सर्वाधिक कमकुवत दिसून आले. याच दोन निर्देशांकांनी भारतीय शेअर बाजाराला खाली खेचण्याचे काम केले. निफ्टी आयटी सर्वाधिक दोन टक्के तर मेटल निर्देशांक 3 टक्के इतका कोसळला होता. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 2 टक्के घसरला होता. या सोबत रियल्टी 1 टक्क्यांपेक्षा अधिक निफ्टी प्रायव्हेट बँक जवळपास अर्धाटक्का कमकुवत होत बंद झाला. फार्मा निर्देशांकांनी बाजाराला सहारा देण्याचा प्रयत्न केला. फार्मा निर्देशांक 227 अंकांनी वाढत 24989 अंकांवर बंद झाला. या व्यतिरिक्त कमोडीटीज, ऑटो, सीपीएसई, फायनॅन्शीयल, एनर्जी, इन्फ्रा, एफएमसीजी, ऑईल आणि गॅस यांचे निर्देशांकही नुकसानीसोबत बंद झाले.

समभागांवर नजर

विविध समभागांची कामगिरी पाहता सिप्ला, डॉ.रे•ाrज लॅब्ज, पॉवरग्रीड कॉर्प, अॅक्सिस बँक, सनफार्मा आणि मारुती सुझुकी यांचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे आयटी क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस, विप्रो तसेच पोलाद क्षेत्रातील जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, तसेच अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग घसरणीसोबत बंद झालेले दिसले.

Advertisement
Tags :

.