For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवारीही शेअरबाजारात घसरणीचा कल

06:48 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंगळवारीही शेअरबाजारात घसरणीचा कल
Advertisement

सेन्सेक्स 238 अंकांनी घसरला, सरकारी बँका, आयटी समभागांची विक्री, ऑटो समभाग चमकले

Advertisement

भारतीय शेअरबाजारात मंगळवारीही घसरण दिसून आली होती. सेन्सेक्स 238 अंकांनी तर निफ्टी 50 अंकांनी घसरत बंद झाला. सरकारी बँका आणि आयटी समभागांनी बाजारावर दबाव निर्माण केला.

त. भा. वृत्तसंस्था मुंबई 

Advertisement

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 238 अंकांनी घसरुन 77470 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 50 अंकांनी घसरत 24187 अंकांवर बंद झाला. याचदरम्यान निफ्टी बँक निर्देशांक 109 अंकांनी कमकुवत होत 57835 अंकांवर बंद झाला. मंगळवारी निफ्टी एक्सपायरीदिवशी आयटी निर्देशांकही कमकुवत होत बंद झाला. हा निर्देशांक 177 अंकांनी घसरत 28984 अंकांवर बंद झाला.

विविध निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास ऑटो, कमोडिटीज, इन्फ्रा, मेटल, फार्मा व रियल्टी या क्षेत्राच्या निर्देशांकांनी तेजी दाखवली होती. तर दुसरीकडे सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, आयटी, ऑइल व गॅस यांचे निर्देशांक कमकुवत झालेले दिसून आले. सर्वाधिक तेजी ही ऑटो निर्देशांकात राहिली. हा निर्देशांक 252 अंकांनी वाढत 27280 अंकांवर बंद झाला. तर सर्वाधिक घसरणीत आयटी निर्देशांक होता.

हे समभाग वधारले

शेअरबाजारातील समभागांची कामगिरी पाहिल्यास श्रीराम फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, आयशर मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, इंडिगो, ग्रासिम, महिंद्रा आणि महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, बीईएल, जियो फायनान्स, कोल इंडिया, भारती एअरटेल, नेस्ले, हिंडाल्को, एनटीपीसी, सनफार्मा, लार्सन टुब्रो, ओएनजीसी, अपोलो हॉस्पिटल, आयसीआयसीआय बँक, एचयुएल, मुथुट फायनान्स, एमआरपीएल, एसआरएफ, प्रेस्टीज इस्टेटस यांचे समभाग वधारले होते.

हे समभाग घसरले

दुसरीकडे घसरणीत पाहता टेक महिंद्रा, इटर्नल, मॅक्स हेल्थकेअर, ट्रेंट, टाटा कंझ्युमर, एसबीआय, एचडीएफसी बँक, विप्रो, रिलायन्स, डॉ. रे•िज लॅब्ज, टीसीएस, इन्फोसिस, बजाज ऑटो, पॉवरग्रिड कॉर्प, टाटा मोटर्स पीव्ही, आयटीसी, वन 97(पेटीएम), डिक्सन टेक्नॉलॉजी, टाटा टेक, एचडीएफसी एएमसी, टाटा इएलक्सएसआय, ऑईल इंडिया या समभागांचा समावेश होता.

आशियाई बाजारात पाहता दक्षिण कोरीयाचा कोस्पी 3.5 टक्के तेजीसह 6748 स्तरावर कार्यरत होता. तर जपानचा निक्केई 3,26 टक्के तेजीसह 66232 च्या स्तरावर बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंग मात्र 0.04 टक्के घसरत 25132 च्या स्तरावर कार्यरत होता.

Advertisement
Tags :

.