शेअरबाजारात घसरणीचा कल कायम
सेन्सेक्स 570 अंकांनी घसरला, निफ्टीही दबावात, गुरुवारी 10 लाख कोटींवर पाणी
वृत्तसंस्था/मुंबई
ऑक्टोबर महिन्याची शेअरबाजाराची सुरुवातही निराशाजनक दिसून आली. ऑटो व एफएमसीजी निर्देशांकांच्या कमकुवत कामगिरीमुळे बाजारात दबाव होता. गेल्या 25 वर्षात पाहता पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजार 8 आठवडे घसरणीत राहिला असल्याची नोंद झाली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पाहता बाजार नीचांकी स्तरावर बंद झाला आहे. याचदरम्यान 4 दिवसात 20 लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांचे स्वाहा झाले आहेत. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 570 अंकांनी घसरत 71909 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 198 अंकांनी घसरत 22421 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 182 अंकांनी घसरत 54450 अंकांवर बंद झाला.
कोणते समभाग तेजीत, घसरणीत
निफ्टीत पाहता इन्फोसिसचा समभाग 4 टक्के, एचडीएफसी लाइफ 2.4 टक्के, एचडीएफसी बँक 1.76 टक्के, एसबीआय लाइफ 1.49 टक्के, मॅक्स हेल्थकेअर 1 व टीसीएसचा समभाग 1 टक्का वाढत बंद झाला होता. विप्रो, एशियन पेंटस, हिंडाल्को, टेक महिंद्रा, टाटा कंझ्युमर्स, बजाज फिनसर्व्ह यांचे समभागही तेजीत राहिले होते. मिडकॅप निर्देशांकात आयडीबीआय बँक, एम्फासिस, कोफोर्ज, सीजी पॉवर, कमिन्स, पर्सिस्टंट सिस्टम्स यांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले. दुसरीकडे बजाज ऑटो सर्वाधिक 7 टक्के, मारुती सुझुकी 4.85 टक्के, श्रीराम फायनान्स 3.8 टक्के तर टाटा स्टील, अदानी पोर्टस व ग्रासिम यांचे समभाग 3 टक्क्याहून अधिक घसरणीत होते. तसेच सिप्ला, नेस्ले, लार्सन टुब्रो, जियो फायनान्स, डॉ. रे•िज लॅब्ज, आशयर मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, इंडिगो, ओएनजीसी, महिंद्रा, बजाज ऑटो, टाटा मोटर्स पीव्ही, भारती एअरटेल यांचे समभागही दबावात होते. मिडकॅप निर्देशांकात पी बी फिनटेक, कल्याण ज्वेलर्स, युपीएल, एबी फॅशन अँड रिटेल, सेल यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी
गुरुवारी चौथ्या दिवशी शेअरबाजारात घसरणच दिसून आली. यात विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरीही नकारात्मक दिसून आली. फक्त आयटी हा एकमेव निर्देशांक गुरुवारी तेजीत होता. हा निर्देशांक 599 अंकांनी वाढत 28304 अंकांवर बंद झाला. ऑटो व एफएमसीजी हे दोन निर्देशांक सर्वाधिक घसरणीत होते. ऑटो 909 अंकांनी घसरत 25384 अंकांवर बंद झाला होता तर एफएमसीजी 718 अंकांनी घसरुन 43789 अंकांवर बंद झाला. याव्यतिरीक्त कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, इन्फ्रा, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांकही कमकुवत झालेले होते.

- इन्फोसिस 1035
- टीसीएस 2079
- एचसीएल टेक 1246
- एचडीएफसी बँक 719
- कोटक महिंद्रा 419
- टेक महिंद्रा 1539
- हॅवेल्स इंडिया 1040
- कमिन्स 4859
- एसबीआय लाईफ 1726
- मॅक्स हेल्थकेअर 944
- विप्रो 159
- बँक ऑफ बडोदा 231

- मारुती सुझुकी 11400
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 2851
- टाटा स्टील 179
- अदानी पोर्ट 1737
- आयटीसी 257
- पॉवरग्रिड कॉर्प 254
- हिंदुस्थान युनि 1841
- इटर्नल 313
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3685
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1166
- एनटीपीसी 316
- भारत इले. 383
- अल्ट्राटेक सिमेंट 10799
- आयसीआयसीआय 1305
- बजाज फायनान्स 949
- टायटन 4535
- इंटरग्लोब एव्ही. 4921
- ट्रेन्ट 2597
- अॅक्सिस बँक 1214
- भारती एअरटेल 1741
- एसबीआय 954
- सनफार्मा 1810
- एशियन पेन्ट्स 2406
- बजाज फिनसर्व्ह 1729
- आयशर मोर्ट्स 6949
- अंबुजा सिमेंट 363
- एयू स्मॉल फायनान्स 990
- कोलगेट 1735