महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेन्सेक्स-निफ्टीमधील घसरणीचा प्रवास कायम

07:00 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बँकिंग क्षेत्र नुकसानीत : सलग चौथे सत्र प्रभावीत

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात सलग चौथ्या सत्रात गुरुवारी शेअर बाजार अजूनही गुंतवणूकदारांसाठी विशेष असे वातावरण नाही आहे. कारण  बीएसई सेन्सेक्स व एनएसईचा निर्देशांक प्रभावीत होत बंद झाला आहे. यामध्ये बाजारातील मंदीची कारणे प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांमधील तणाव, एफपीआयकडून शेअर्सची प्रचंड विक्री, चीनकडून स्वस्त व्याजाने कर्जे आणि अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील वाढती काटेरी स्पर्धा ही आहेत. वरील सर्व घडामोडींच्या परिणामुळे गुरुवारी दिवसअखेर सेन्सेक्स 16.82 अंकांनी घसरून 0.02 टक्क्यांसोबत निर्देशांक 80,065.16 वर बंद झाला तर निफ्टी 36.10 अंकांनी घसरून 24,399.40 वर बंद झाला. दरम्यान, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात मोठी घसरण रोखण्यात बाजाराला यश आले.

काही क्षेत्रांची स्थिती?

निफ्टीत पीएसयू बँकेच्या समभागांनी सर्वाधिक 1.22 टक्क्यांची तेजी घेतली  तर निफ्टी बँकने 0.57 टक्क्यांच्या वाढीत राहिली. यासोबतच वित्तीय सेवा क्षेत्रातही वाढ दिसून आली. याशिवाय निफ्टी फार्मा , निफ्टी प्रायव्हेट बँक आणि ऑइल अँड गॅस वधारुन बंद झाले आहेत.  एफएमसीजी हे क्षेत्र सर्वाधिक घसरण नोंदवणारे क्षेत्र होते. याशिवाय रियल्टी , धातू, मीडिया, आयटी  आणि वाहन क्षेत्रात घसरणीची नोंद झाली आहे.  निफ्टी 50 च्या 50 समभागांपैकी 26 समभाग वाढीसह बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग सर्वाधिक 2.66 टक्क्यांनीर वाढला. याशिवाय श्रीराम फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा , ग्रासिम, टायटन, भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स 1 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. अल्ट्राटेक बीएसई सेन्सेक्सवर 2.77 टक्क्यांनी वधारले. अन्य कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचे समभाग सर्वाधिक 5.81 टक्क्यांनी घसरले. याशिवाय एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी, हिंडाल्को, नेस्ले इंडिया आणि बजाज ऑटो, आयटीसींचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक घसरले. तसेच नेस्ले इंडिया, आयटीसी, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, टीसीएस, इन्फोसिस, एलअँडटी, कोटक बँक, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स प्रभावीत राहिले आहेत.

जागतिक बाजारपेठ

आशियाई बाजारात सेऊल, शांघाय आणि हाँगकाँग कमी तर टोकियो वर बंद झाले. युरोपीय बाजार सकारात्मक क्षेत्रात व्यवहार करत होते. रात्रभर, यूएस बाजार नकारात्मक क्षेत्रात बंद झाले. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 1.99 टक्क्यांनी वाढून 76.45 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, शेअर बाजारासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) प्रचंड, अभूतपूर्व आणि सततची विक्री. 23 ऑक्टोबरपर्यंत ही विक्री 93,088 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली नाही.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article