For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत डोवालांची चर्चा

06:43 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत डोवालांची चर्चा
Advertisement

गाझामधील युद्धासोबत अनेक मुद्दे चर्चेत सामील

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान नेतान्याहू यांनी गाझापट्टीत सुरू असलेल्या युद्धासंबंधीची माहिती डोवाल यांना दिली आहे. दोन्ही देशांकडून ओलिसांची मुक्तता आणि मानवी मदत पुरविण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली आहे.

Advertisement

या भेटीची माहिती इस्रायल पंतप्रधानांच्या सोशल मीडिया अकौंटवरून देण्यात आली आहे. या बैठकीत इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे संचालक, पंतप्रधानांच्या विदेश धोरणाचे सल्लागार आणि इस्रायलमधील भारतीय राजदूताने भाग घेतला आहे.

शस्त्रसंधीवर जोर देतोय हमास

रमजानच्या महिन्यात हमास प्रमुखाने पुन्हा एकदा गाझामध्ये शस्त्रसंधीची मागणी केली आहे. गाझामध्ये शस्त्रसंधी लागू करण्यासाठी इस्रायलसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे हमास प्रमुख इस्माइल हानियेहने म्हटले आहे. गाझामध्ये शस्त्रसंधी लागू करण्यावरून अनेकदा मध्यस्थी अयशस्वी ठरली आहे. गाझामध्ये शस्त्रसंधीसाठी कुठल्याही प्रकारची सहमती न होण्यासाठी इस्रायल जबाबदार आहे. तरीही आम्ही शस्त्रसंधीसाठी चर्चा सुरु ठेवण्यास तयार आहोत असा दावाही हानियेहने केला आहे.

उपासमारीची वेळ

गाझामध्ये युद्धामुळे लोकांवर मोठे संकट ओढवले आहे. 5 महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध रोखण्यासाठीची चर्चा अयशस्वी ठरली आहे. यामुळे गाझामधील रहिवाशांवर उपासमारीची वेळ आली आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल जोरदार कारवाई केली आहे. या संघर्षात गाझामध्ये आतापर्यंत 30 हजारांहुन अधिक जण मारले गेले आहेत.

Advertisement
Tags :

.