For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुरुंगात कैद इम्रान खान यांची वैद्यकीय तपासणी

06:43 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
तुरुंगात कैद इम्रान खान यांची वैद्यकीय तपासणी
Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगातून रुग्णालयात नेण्यात आले. इम्रान हे सध्या अदियाला तुरुंगात कैद आहेत. डोळ्यांचा गंभीर आजार ‘राइट सेंट्रल रेटिनल वेन ऑक्लूजन’साठी निश्चित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. रुग्णालयात इम्रान यांना इंट्राविट्रियल एंटी-व्हीईजीएफ इंजेक्शन देण्यात आले आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

74 वर्षीय इम्रान यांच्या डोळ्यांची वैद्यकीय तपासणी डॉक्टरानी केली आहे. इम्रान खान यांची प्रकृती तुरुंगात ढासळत असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांचे समर्थक करत आहेत. अशास्थितीत इम्रान यांच्यावर त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत उपचार केले जावेत अशी मागणी समर्थकांकडून केली जात आहे. तर प्रशासनाने या मागणीला फेटाळले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.