डबल महाराष्ट्र केसरी मल्लाचा शड्डू घुमणार सांगरूळच्या मैदानात
शिवराज, पृथ्वीराज व किरण भगत एकाच मैदानात; मैदानाची युद्धपातळीवर तयारी
सांगरूळ / वार्ताहर
येथील राजर्षी शाहू नाळे तालीम मंडळाच्या वतीने उद्या रविवार दिनांक ३ मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. मैदानातील प्रमुख कुस्त्या डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत या महाराष्ट्रातील आघाडीच्या मल्लांच्या आहेत . आसून कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठे कुस्ती मैदान होत असल्याने या कुस्ती मैदानाबद्दल कुस्ती शौकिनांच्यात औत्सुक्य निर्माण झाले आहे . डबल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी असणाऱ्या मोठ्या जोडीतील नामवंत मल्लांच्या कुस्त्या असल्याने मैदानाला कुस्ती शौकिनांची सांभाव्य गर्दी लक्षात घेऊन संयोजकांची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.
सांगरूळ परिसरात अनेक लहान मोठी कुस्ती मैदाने आयोजित केली जातात .अनेक नामवंत मल्लांच्या प्रेक्षणीय लढती या परिसरातील कुस्ती शौकीनानी अनुभवल्या आहेत .पण यावेळी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत प्रथमच या परिसरात लढणार असल्यामुळे कुस्ती मैदानाला वेगळे वलय प्राप्त झाले आहे .परिसरात सर्वत्र या कुस्ती मैदानाची चर्चा सुरू आहे .
महाराष्ट्रात होणाऱ्या विविध मैदानात शिवराज राक्षे सातत्याने आक्रमक कुस्त्या करत विजयी होत असल्याने कुस्ती शौकीनाना त्याच्या खेळाची भुरळ पडली आहे .
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सांगरुळ गावात शिवराज राक्षे सारख्या डबल महाराष्ट्र केसरी मल्लाची प्रथमच कुस्ती होत असल्याने परिसरात मोठे औत्सुक्य निर्माण झाले आहे.कुस्ती मैदानासाठी गर्दी लक्षात घेऊन संयोजक सुशांत नाळे यांनी राजर्षी शाहू नाळे तालीम मंडळाच्या वतीने जोरदार तयारी सुरू केली आहे . १९७० दशकात डबल महाराष्ट्र केसरी स्व . लक्ष्मण वडार यांची कर्नाटकच्या मल्ला बरोबर सांगरूळ मध्ये कुस्ती झाली होती .