For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जानेवारीत वाहन विक्रीत दोन अंकी वाढ

06:50 AM Feb 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
जानेवारीत वाहन विक्रीत दोन अंकी वाढ
Advertisement

4 लाखाहून अधिक प्रवासी वाहनांची जानेवारीत विक्रमी विक्री

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी वाहने आणि दुचाकींची जानेवारीतील विक्री दोन अंकी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. जानेवारी महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदविली गेली आहे. जीएसटीमध्ये केलेल्या सुधारणा याचा फायदा ऑटो कंपन्यांना उठविता आला आहे. जानेवारी महिन्यात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री 12 टक्के वाढीसह 449616 इतकी झाली आहे. तर दुचाकींची विक्री 26 टक्के वाढीसह 192563 इतकी झाली आहे. दुचाकी वाहन विक्रीमध्ये स्कूटरची विक्री सर्वाधिक झाली असून तिचे प्रमाण 37 टक्के इतके आहे. मोटारसायकलीचा खप 20 टक्के इतका वाढीव दिसला आहे. सीयाम या संस्थेने ही माहिती दिली आहे. संस्थेचे अधिकारी राजेश मेनन म्हणाले, प्रवासी वाहन, दुचाकी आणि तिचाकींची जानेवारीतील विक्री मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये अधिक राहिली आहे. ही विक्री यंदा दोन अंकी वाढीव नोंदली गेली आहे.

Advertisement

तिचाकी विक्रीत वाढ

जानेवारी महिन्यात तिचाकी विक्री मागच्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत 30 टक्के वाढीव पहायला मिळाली. ही विक्री 75725 इतकी नोंदली गेली आहे. नव्या वर्षाची सुरूवात सकारात्मकतेने झाली आहे. जीएसटी दरात केलेली कपात ही वाहन मागणी वाढीसाठी फलदायी ठरली आहे.

निर्यातीतही आहे दम

एप्रिल ते जानेवारी कालावधीत प्रवासी वाहनांची निर्यात 17 टक्के वाढली होती. 7 लाख 47 हजारांहून अधिक वाहनांची निर्यात करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.