महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तनिष्का कोरीशेट्टीला दुहेरी मुकुट

10:10 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रोटरी क्लब वेणुग्राम चषक बॅडमिंटन स्पर्धा : अर्णा, अथर्व, सामान्या, नमन विजेते 

Advertisement

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव व स्टारलाईन बॅडमिंटन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोटरी क्लब वेणुग्राम चषक बॅडमिंटन स्पर्धेत अर्णा असुंडी, तनिष्का कोरीशेट्टी, अर्थव हुबळीकर, ओंम यलीगार, सामान्या देशपांडे, नमन हसबे, सौम्या देशपांडे यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले आहे. बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या सभागृहात आयोजित केलेल्या विविध गटातील बॅडमिंटन स्पर्धेत बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या खेळाडूंनी भाग घेऊन यश संपादन केले आहे. 13 वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटात अर्णा असुंडीने अस्ता हुबळीचा 15-8, 15-8 अशा सरळ गुणफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात तनिष्का कोरीशेट्टीने आदीत्य असुंडीचा 11-15, 15-8, 15-9 अशा गुणफरकाने पराभव करून विजेतेपद तर आदीतीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या एकेरीत तनिष्का कोरीशेट्टीने ऐश्वर्याचा 8-15, 15-3, 15-13 अशा गुणफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले.

Advertisement

पुरूष एकेरीत अर्थव हुबळीकरने माहीमचा 8-3 असा गुण असताना माहिमने अर्थव हुबळीकरला पुढे चाल दिली. अर्थव हुबळीकरने या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. पुरूष दुहेरीत अर्थव हुबळीकर व ओंम यल्लीगार या जोडीने अंतिम सामन्यात तेजस आणि नवनीत जोडीचा 15-14, 15-14 अशा गुणफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. 11 वर्षाखालील मुलांच्या गटात सामान्या देशपांडेने अंतिम सामन्यात याशीचा 15-4, 15-6 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तर 13 वर्षाखालील मुलांच्या गटात नमन हसबेने अंतिम सामन्यात प्रितमचा 15-11, 15-7 अशा गुण फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. अर्थव हुबळीकर, ओंम यलीगार, नमन हसबे, सामान्या देशपांडे, तनिष्का कोरीशेट्टी, अर्णा असुंडी, आदीत्य असुंडी हे सर्व बॅडमिंटन पटू बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या सभागृहात सराव करीत असून त्यांना बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अणवेकर व वाफा अनवारी मार्गदर्शन तर बॅडमिंटन संघटनेचे सचिव आनंद हावण्णावर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article