तनिष्काला दुहेरी मुकूट; अभिनव,सुचित धरण्णावर, साक्ष्या विजेते
बेळगाव : बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटना विनया कोटियन मानांकित राज्यस्तरीय टे.टे. स्पर्धेत 13 वर्षांखालील गटात तनिष्का कपिल काळभैरव, अभिनव प्रसन्ना, साक्ष्या संतोष, सुचित धरण्णावर यांनी विजेतेपद पटकाविले. बेळगाव क्लबच्या सभागृहात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शेवटच्या दिवशी 13 वर्षांखालील गटात मुलींच्या विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तनिष्का काळभैरव वि.वि. इरणी सुभाषचा 11-4, 11-4, 11-8 तर उपांत्य फेरीच्या सामन्यात मिहीका उदुपाने साक्ष्या संतोषचा 11-8, 11-7, 8-11, 12-10 अशा सेटमध्ये पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तनिष्का काळभैरवने मिहीका उदुपाचा 11-1, 11-2, 11-5 अशा सेटमध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अभिनव प्रसन्नाने सामंत भट्ट ए. एस.चा 11-4, 11-6, 9-11, 12-10 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात सात्विक एम.ने सुचित धारणावरचा 11-3, 11-8, 5-11, 11-7 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात अभिनव प्रसन्नाचा सात्विक एम.चा 11-4, 11-5, 13-11 अशा सेटमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकाविले. मुलींच्या होप्स गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अध्या एम. ने श्रीस्ती धिरवालचा 11-6, 11-9, 10-12, 12-10 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात साक्ष्या संतोषने अंजलिना क्रिस्टी प्रदीपचा 11-4, 11-1, 11-6 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात साक्ष्या संतोषने अध्या एम.चा 14-12, 11-3, 11-4 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात सुचित धिरणावरने अंकुश बालिगाचा 9-11, 11-9, 12-11, 6-11, 11-5 तर उपांत्य सामन्यात अर्णव मिथूनने करंबळकरचा 11-7, 7-11, 11-6, 11-6 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सुचित धिरणावरने अंकुश अर्णव मिथूनचा 6-11, 11-7, 11-8, 11-7 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. प्रमुख पाहुणे म्हणून नागेश छाब्रिया, अशोधर कोटियन, दीपक यकुंडी, मंजुनाथ उपाध्येय टी. आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या टेबट टेनिसपटूंना चषक, प्रमाणपत्र, रक्कम देण्यात आली.