राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संत मीराला दुहेरी मुकुट
बेळगाव : कुरुक्षेत्र हरियाणा येथे विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघाने विजेतेपदासह दुहेरी मुकुट संपादन करून एसजीएफआय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. येथे 28 ते 2 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा दक्षिण मध्यक्षेत्रने पूर्व पश्चिमक्षेत्राचा 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. संत मीरा संघाच्या निधीशा दळवीने एकमेव गोल केला. माध्यमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतील संत मीरा दक्षिण-मध्य क्षेत्रने पूर्वक्षेत्र पंजाबचा 1-0 असा पराभव केला. संतमीरा संघाच्या दीपिका रियांगने एकमेव गोल केला. वरील दोन्ही संघ आगामी होणाऱ्या जम्मू कश्मीर व महाराष्ट्र येथे एसजीएफआय शालेय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
वरील फुटबॉल खेळाडूंचे गटशिक्षणअधिकारी रवी बजंत्री, एस पी दासपणावर, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, ए. बी. शिंत्रे, जाहिदा पटेल, साधना बद्री, प्रकाश पाटील, उमेश कुलकर्णी, आर पी वंटगुडी, डॉ नवीन शेट्टीगार, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाचे अभिनंदन व सत्कार तसेच राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक सी. आर. पाटील, शिवकुमार सुतार, चंद्रकांत तुर्केवाडी, शामल दड्डीकर,प्रेमा मेलीनमनी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजेत्या प्राथमिक 14 वर्षाखालील मुलींच्या संघात कर्णधार निधीशा दळवी, उपकर्णधार समीक्षा खन्नूरकर, श्रेया लाटुकर, हर्षदा जाधव, समृद्धी कोकाटे, धनश्री जमखंडीकर, राधा धबाले, कल्याणी हलगेकर, अनन्या रायबागकर, सिंचना तिगडी, हर्षिता गवळी, समृद्धी घोरपडे, सृष्टी सातेरी, आदिती सुरतेकर, अद्विता दळवी, कनिष्का हिरेमठ, कृतिका हिरेमठ, तर माध्यमिक 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कर्णधार चैत्रा इमोजी, उपकप्तान दीपा बिडी, अंजली चौगुले, ऐश्वर्या शहापूरमठ, चरण्या एम, भावना कौजलगी, सृष्टी बोंगाळे, किर्तीका लोहार, दीपिका रेंग, मोनिता रेंग, अमृता मलशोय, सान्वी पाटील, संस्कृती भंडारी, जिया बाचीकर या खेळाडूंचा संघात समावेश आहे.