For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एमएसडीएफ मुलींच्या संघाला दुहेरी मुकुट

10:15 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
एमएसडीएफ मुलींच्या संघाला दुहेरी मुकुट
Advertisement

खेलो इंडिया मुलींच्या फुटबॉल स्पर्धा : भगवान महावीर विजेता

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित खेलो इंडिया 13,15, व 17 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे अंतिम अंतिम सामन्यात 17 व 15 वर्षाखालील गटात एमएसडीएफ संघाने संत मीराचा पराभव करून दुहेरी मुकुट तर 13 वर्षा खालील गटात भगवान महावीर संघाने एमएसडीएफ 1-0 संघाचा  निसटता पराभव करून खेलो इंडिया स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावरती खेळविण्यात आलेल्या खेलो इंडिया मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात अंतिम सामन्यात एमएसडीएफ संघाने संत मीराचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 12 व्या मिनिटाला जोया मुल्लाच्या पासवर आलिशा बोरजेसने पहिला गोल करून 1-0 आघाडी मिळून दिली. 15 व्या मिनिटाला आलिशा बोरजेसच्या पासवर दिशा डोंगरेने गोल करून 2-0 ची महत्वाची आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्राच्या शेवटच्या मिनिटाला दिशा डोंगरेच्या पासवर झोया मुल्लाने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली. दुसऱ्या सत्रात संत मीरा व एमएसडीएफ संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. 15 वर्षाखालील  गटात खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात एमएसडीएफ संघाने संत मीरा संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला रिया वाळकेच्या पासवर वसुंधरा चव्हाणने पहिला गोल केला. 22 व्या मिनिटाला श्रावणी सुतारच्या पासवर साक्षी चिटगीने गोल करून 2-0 ची आघाडी  पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 32 व्या मिनिटाला वसुंधरा चव्हाणच्या पासवर श्रावणी सुतारने गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. 39 व्या मिनिटाला साक्षी चिटगीच्या पासवर रिया वाळकेने चौथा गोल करून 4-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात संत मीरा संघाला गोल करण्यात अपयश आले.

13 वर्षा खालील गटात भगवान महावीर संघाने एमएसडीएफ संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण दोन्ही संघांना अपयश आले. दुसऱ्या सत्रात पुन्हा दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी आक्रमक चढाया सुरू केल्या. खेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना भगवान महावीरच्या इंद्रायणी पावनोजीच्या पासवर मनाली झेंडेने गोल करून 1-0 मिळून दिली त्यानंतर एमएसडीएफ संघाने गोल करण्यासाठी प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. सामन्यानंतर बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहर गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, पीईओ जी बी पटेल, स्पोर्टस ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे कुस्ती प्रशिक्षक व खेलो इंडियाचे प्रतिनिधी नवनीत बंगेरा पंजाब, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष लेस्टर डिसोजा, गोपाळ खांडे, सचिव अमित पाटील, एस एस नरगोडी, अल्लाबक्ष बेपारी, व्हिक्टर परेरा, प्रशांत देवदानम, मयूर कदम, हरियाण बल्लाळ, मॅन्युअल डिक्रुझ, मतीन ईनामदार, मानस नायक, आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एमएसडीएफ व भगवान महावीर तर उपविजेत्या संत मीरा संघाना चषक, प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन गौरविले. यावेळी गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ म्हणाल्या खेलो इंडियाने मुलींसाठी व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्याचा फायदा घेत मुलींनी सुद्धा फुटबॉल मध्ये आपले कौशल्य दाखवावे. खेलो इंडियाने पुढील शैक्षणिक वर्षात या स्पर्धा डिसेंबर पर्यंत आयोजित कराव्यात जानेवारीनंतर अभ्यासाचे ताण असल्यामुळे  मुलींना फुटबॉल पासून वंचित रहावे लागणार आहे तरी बीडीएफए व कर्नाटक फुटबॉल संघटनेने या गोष्टीचा विचार करून खेलो इंडिया समितीला कळवावे. बेळगाव बीडीएफेने खेलो इंडिया स्पर्धा सुरू करून मुलींच्या फुटबॉलला चालना दिली आहे. एक हे कार्य कौतुकास्पद आहे असे त्या म्हणाल्या. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीडीएफएच्या सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.