महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विंडीजच्या डॉटीनचा निवृत्तीचा निर्णय मागे

06:14 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

विंडीज महिला क्रिकेट संघातील अनुभवी आणि अष्टपैलू दियांद्रा डॉटीनने यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. पण आता तिने हा निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असून ती आगामी होणाऱ्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी उपलब्ध राहणार असल्याचे विंडीजच्या मंडळाने कळविले आहे.

Advertisement

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बार्बाडोस संघाचे तिने नेतृत्व केले होते. या स्पर्धेनंतर डॉटीनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. जवळपास 2 वर्षांच्या कालावधीनंतर डॉटीनने यापूर्वी घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा क्रिकेट क्षेत्रात पदार्पण करण्याचे ठरविले आहे. महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या संघ निवडीवेळी आपण उपलब्ध असल्याचे विंडीज क्रिकेट मंडळाला तिने कळविले आहे. डॉटीनने विंडीज महिला क्रिकेट संघाचे 143 वनडे सामन्यात प्रतिनिधीत्व करताना 30.54 धावांच्या सरासरीने 3,727 धावा जमविल्या आहेत. तसेच तिने 127 टी-20 सामन्यात 2,697 धावा जमविल्या असून 33 वर्षीय डॉटीनने 2010 साली झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळताना 38 चेंडूत शतक झळकविण्याचा विक्रम केला होता. आगामी महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तिची निवड संघात जवळपास निश्चित असल्याचे बोलले जाते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article