गोव्यात लवकरच घरपोच आराेग्य सेवा
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची महत्वपूर्ण घोषणा: ‘स्टेट केअर’ उपक्रमांतर्गत गोव्यात होणार आरोग्यक्रांति
त. भा. प्रतिनिधी
पणजी : एनसीटीपी लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आरोग्यसेवा संचालनालयाला 19 अत्याधुनिक रूग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यांचा उद्घाटन सोहळा काल बांबोळीत गोमेकॉ येथे करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री राणे यांनी वरील महत्वपूर्ण घोषणा केली.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, एनटीपीसीच्या एचआर वंदना चतुर्वेदी, गोमेकॉचे डीन जयप्रकाश तिवारी, आरोग्य संचालनालयाच्या संचालिका डॉ. रूपा नाईक, सहसचिव आरोग्य प्रणव भट, युरी डायस, डॉ. केदार रायकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
जलद आरोग्यसेवा मिळणार : नाईक
नव्या 19 रुग्णवाहिका मिळाल्याने आता राज्यातील 108 रूग्णवाहिका सेवेला मोठे बळ मिळणार आहे. दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत जलद आणि दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
एनटीपीसीचे सहकार्य महत्वचे
एनटीपीसीने या प्रकल्पासाठी सीएसआर अंतर्गत सहा कोटी ऊपयांचा निधी मंजूर केला असून त्यातून ही 19 वाहने उपलब्ध झाली आहेत. यापूर्वीही कंपनीने सुमारे चार कोटी ऊपयांची अत्याधुनिक मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन गोवा मेडिकल कॉलेजला दिली होती. त्यामुळे कर्करोगाचे लवकर निदान होऊन अनेक ऊग्णांना लाभ झाल्याचेही मंत्री नाईक यांनी नमूद केले.
केंद्राकडून गोव्याला मोठे सहकार्य
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कर्करोग विभाग, धारबांदोडा येथील एम्स, रायबंदर येथील आयुष संशोधन केंद्र आणि इतर आरोग्य प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळवून देण्यात येत आहे. शिक्षण, अक्षय ऊर्जा आणि सामाजिक विकास क्षेत्रातही विविध प्रकल्प राबविण्यात आले असून चार शालेय बस, पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांसाठी सौरऊर्जा व्यवस्था, सार्वजनिक संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रणाली, दिव्यांगांसाठी मोटारचालित त्रिचाकी व इलेक्ट्रकि व्हीलचेअर, आयपीएचबीसाठी ऊग्णवाहिका, कृत्रिम अवयव वितरण तसेच विविध पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली.
एनटीपीसी ही केवळ वीज निर्मिती करणारी कंपनी राहिलेली नाही. पूर्वी कंपनीचे नाव नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन होते; मात्र आज ती ऊर्जा क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये कार्यरत असलेली बहुआयामी कंपनी म्हणून विकसित झाली आहे. एनटीपीसीक डून प्रदान करण्यात आलेल्या ऊग्णवाहिका गोव्याच्या आरोग्य सेवेसाठी महत्त्वपूर्ण जीवनदायी आधार ठरतील, असा विश्वास वंदना चतुर्वेदी यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. वंदना धुमे यांना त्यांच्या कार्याची स्मृती जागवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
पंतप्रधानांची संकल्पना प्रत्यक्षात साकारणार
पंतप्रधान मोदी यांच्या ‘आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकाच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे’ या संकल्पनेनुसार गोवा देशातील पहिले राज्य म्हणून स्टेट केअर हा उपक्रम राबविणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. एनटीपीसीच्या सहकार्यामुळे 108 ऊग्णवाहिका सेवा अधिक बळकट होईल आणि राज्यातील नागरिकांना त्याचा मोठा लाभ मिळेल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.
निडणुकीपूर्वी नव्या 100 रुग्णवाहिका घेणार
मागील साडेचार वर्षे राज्यातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात ऊग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्याचा कालावधी खूपच कमी आहे. हा कालावधी अजून दहा मिनिटांपेक्षा कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नव्या 100 ऊग्णवाहिका घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक तालुक्मयात आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र उभारण्यात येईल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी यावेळी सांगितले.