महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दार.... महाद्वार....5

06:10 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हे सगळे बाहेरचे दरवाजे बघताना आपल्या मनालाही दारं आहेत याची कल्पना आपल्याला यायला लागते. कधीतरी आपण, ही दारं उघडी टाकतो तर कधी इतके घट्ट मिटून घेतो की शेवटी ती बंद दारं आपल्याबरोबर मिटलेल्या अवस्थेतच वैकुंठाला जातात. या दरवाजांच्या आत म्हणजे मनाच्या कप्प्यात आपण किती आणि काय काय दडवून ठेवतो ही ज्याची त्यालाच कल्पना येते. फक्त त्याचे परिणाम मात्र आमच्या शरीरावर दिसायला लागतात आणि मनाच्या डॉक्टरकडे धाव घ्यायला लागते. मग तो डॉक्टर या मनातला कचरा हळूहळू साफ करायला लागतो. परंतु मुळातच इतक्या प्रचंड कचऱ्याचे थर या मनावरती जमलेले असतात की आपण स्वत: कोलमडून जायची शक्यता जास्त असते.

Advertisement

आपण सगळेच जन्मत: बुद्धिमान असल्यामुळे सगळं स्मरणात ठेवण्याचाच प्रयत्न जास्त करतो आणि मग लक्षात येतं की आपण नको त्या गोष्टी नको तेवढं महत्त्व देऊन स्मरणात ठेवल्या आणि चांगल्या गोष्टी मात्र आम्ही विस्मरणात घालून बसतो. चांगले क्षण विस्मरणात पाठवले की लक्षात येते, देवाने दिलेल्या दोन प्रकारच्या गोळ्या घेण्याची पद्धत आम्ही बदलून टाकतो. देवाने जन्मत: आम्हाला दोन प्रकारच्या गोळ्या मुठीत दिलेल्या असतात. एक सुखाची तर एक दु:खाची.

Advertisement

सुखाची गोळी चघळत राहायचं असं आम्हाला बजावलेलं असतं, तर दु:खाची गोळी गिळून टाकायची हेही सांगितलेलं असतं. पण आम्ही माणसं अतिहुशार असल्यामुळे या दोन्ही गोष्टी नेमक्या उलट्या करायला सुरुवात करतो. दु:ख उगाळत बसतो आणि आनंद मात्र चटकन गिळून टाकतो. तो दुसऱ्यांना दाखवायचासुद्धा प्रयास घेत नाही आणि अशावेळी मग मनाची दारं कुरकुरायला लागतात. अशी मनाची दारं केव्हा बंद करायची आणि केव्हा उघडायची याचं तंत्र तुमच्या स्वभावावर अवलंबून असतं. आम्ही दुसऱ्याचे दोष बघत जगणारे कोणाचाही आनंद स्वीकारत नाही. असे दरवाजे माणसाला जगण्याची दारं हळूहळू बंद करून टाकतात. असं दार बंद करण्याचा प्रसंग ज्ञानदेवांवरती आला होताच. समाजातल्या लोकांच्या वागण्याला उद्विग्न होऊन त्यांनी ही मनाची कवाडे जेव्हा बंद केली, त्यावेळेला ही कवाड बंद झाली तर समाजाचा उद्धारच थांबेल म्हणून मुक्ताबाईने ताटीचे अभंग म्हटले आणि त्यांची ही कवाडं उघडायला लावली. त्यामुळेच समाजाचं जगणं आज सुसह्य झालेलं दिसतं.

दार उघडल्यामुळे भागवत धर्माचे ध्वज अनेक लोक खांद्यावर घेऊन आजही त्या पंढरपूरच्या महाद्वारापर्यंत पोहचतातच. आनंदाचे महाद्वार इथे बघायला मिळते. दारापासून महाद्वारापर्यंतचा प्रवास म्हणजे अध्यात्म ज्या नामस्मरणाने साधता येतं त्यात फक्त ही मनाची दारं उघडण्याच्या क्लुप्त्या शिकवण्याची साधनं म्हणूनच मनाचे दार उघडणार किंवा मनावरच्या गाठी सैल करणारा किलकीलं होणारं दार आम्हाला महत्त्वाचं असतं. आम्ही देवाच्या दारात जाऊन दुसऱ्याचं वाईट होऊन माझं चांगलं होऊ दे हा विचार घेऊन जेव्हा जातो तेव्हा देव तसंच काहीतरी आमच्याही पदरात टाकून मोकळा होतो. कारण तो माणसाला ओळखून आहे. आम्ही जशी साद घालतो तसा तो प्रतिसाद देतो.

म्हणूनच आपण सर्वांनी देवाच्या दारात गेल्यानंतर ‘सर्वे संतु निरामय:’ असं म्हटलं तर त्याच्यात तुमचंही कल्याण असतंच. म्हणून लहान मुलांना लहानपणापासूनच ‘सगळ्यांना सुखी ठेव’ असा मंत्र शिकवतो. यामुळे आमच्या मनाची दारं सर्वांसाठी उघडी ठेवायची सवय आम्हाला आपोआपच लागते. म्हणून मनाची दारं उघडणारं दार आम्हाला नेमकं कोणत्या महाद्वारापर्यंत नेणार हे तेव्हाच ठरतं.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article