महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दार.... महाद्वार....4

06:28 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्लीला गेल्यानंतर जंतर-मंतर बघायला लोक जातातंच. तिथे गेल्यानंतर कोणताच रस्ता न सापडल्यामुळे स्वत:च हरवून जातो की काय? असं वाटून स्वत:ला शोधत बसणारे लोक बघायला मिळतात. असे हे हरवून टाकणारे दरवाजे पाहिले की अनेक प्रकारची दारं डोळ्यासमोर येतात. देवगिरीच्या किल्ल्यात गेल्यावर कोणत्याही दरवाजाने पुढे जायला लागलं की पुन्हा आपण आधीच्या चौकातच येऊन थांबणार, पुढे काही जाता यायचे नाही. शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी कोणते चोर दरवाजे वापरायचे? याचेसुद्धा तंत्र ह्या दारांमुळे खूप विकसित केले गेले होते. बुलंद दरवाजापर्यंत पोहचता पोहचता शत्रूची इतकी दमछाक होत असे की हत्तीच्या साह्याने किंवा मोठ्या ओंडक्याच्या साह्याने दणके दिल्याशिवाय दरवाजे उघडतंच नसतं. या दरवाजांमधील छोटे दरवाजे माणसांना रोजच्या जाण्यासाठी उघडण्याची प्रथा असायची. दिंडी दरवाजा किंवा मोठा दरवाजा हा विशिष्ट दिवशी सणावारालाच उघडला जायचा. प्रत्येक दरवाजाचं नक्षीकाम वेगळं, प्रत्येक दरवाजाची आदब वेगळी. प्रत्येक दरवाजाची सौंदर्यस्थानं वेगळी. प्रत्येक दरवाजा अनुसारच त्याच्या नक्षीकामावरून आतल्या दालनाची आपल्याला नेमकी कल्पना येत असेल त्या त्या दालनाचे वैशिष्ट्या आपल्या अंगाखांद्यावर मिरवणारे रेशमी गोंडांचे पडदे अलगद धरून उभी असलेली ही दारं खूप सुंदर दिसायची. दालन किंवा सिंहासन चिकाच्या पडद्याचे दरवाजे करून महाराण्dयांचे आदमीने संरक्षण करायचे. चोर दरवाजे जसे गुप्त कारवायांसाठीच असायचे तसे शत्रूपासून संरक्षण करणारे असायचे. बायका पोरांच्या प्राण्यांचे रक्षण करायचे. या दाराचा सुगावा लागणार नाही याची काळजी घेतली गेलेली असायची. या दरवाजांसाठी कारागिरांचं कसब पणाला लागायचं. त्याची क्लुप्ती किंवा कळ दाबल्याशिवाय हे दरवाजे मुळीच उघडायचे नाहीत. ज्याची कल्पना फक्त या राजघराण्याच्या लोकांनाच असायची, हे सगळं स्थापत्यशास्त्र किंवा कारागिरी पाहिली की लक्षात येतं. आपण जरी त्या वेळच्या समाजाला किंवा लोकांना अडाणी म्हणत असलो तरीही ते लोक आत्ताच्या सुशिक्षित इंजिनिअरपेक्षा कित्येक पटीने जास्त हुशार असावेत. तळघराचे दरवाजे जमिनीच्या आकाराचेच हस्तीनापुरात देखील अशा स्थापत्याचा नमुना वापरल्याचे दिसते. या ठिकाणी फसवे दरवाजेसुद्धा असल्याचे उल्लेख मिळतात. जिथे दरवाजा आहे असे वाटते तिथे तोंड आपटायची शक्यता जास्त आणि जिथे सहज चालत निघालो की नेमकं कोणत्या दिशेला निघालोय याचीच कल्पना यायची नाही. अशाही गमतीजमती पाहायला मिळतात. जमिनीवर, पाण्यावर अशा काही रांगोळ्या काढल्या जायच्या की काही ठिकाणी जमीन वाटायची त्या ठिकाणी पाणी असायचे आणि पाणी असेल असं वाटेल त्या ठिकाणी जमीन असायची. हे सगळं उत्तम कारागिरीचेच नमुने, या दारांच्या निमित्तानेसुद्धा पाहायला मिळतात. अशी फसवी दारं आपल्या रोजच्या आयुष्यातदेखील भेटतातच. कारण आम्हाला बऱ्याच गोष्टी गृहीत धरून चालायची सवय असते. त्यामुळे असे दरवाजे आम्हाला बरोबर तोंडघशी पाडतात. त्यामुळे आमच्या विचारांची दारंसुद्धा आम्हाला नीट उघडता यायला हवीत हे लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी सावकारांच्या घरात भक्कम तिजोऱ्या पाहायला मिळतात. या तिजोऱ्या त्याचं वजन, त्याचा आकार पाहूनच आपल्याला दडपायला होतं पण या तिजोरीचीसुद्धा विशिष्ट संख्या फिरवून किंवा कृतीने त्याची दारं उघडायला लागायची. तिथे ताकद मात्र तुमची अजिबात उपयोगी यायची नाही. ह्या तिजोरीमध्ये आमच्या भौतिक संपत्तीचे रक्षण केलं जायचं आणि आमच्या वैभवाचे देखील.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article