For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिंता नको, पुरेसा जलसाठा!

11:05 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिंता नको  पुरेसा जलसाठा
Advertisement

दोन महिन्यांहून अधिक काळ पुरेल पाणी : जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांचा दावा

Advertisement

पणजी : गोव्यातील 5 धरणांतील पाणी 50 टक्क्यांहून अधिक कमी असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काल शुक्रवारी जलस्त्राsतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी गोव्याकडे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले. साळावली धरणाचा पाणीसाठा आणखी 130 दिवस पुरेल, तिलारी 144 दिवस पुरेल, आमठाणे 22 दिवस पुरेल, चापोली 447 दिवस पुरेल, अंजुणे 70 दिवस पुरेल आणि पंचवाडीत 170 दिवस पुरेल, एवढा पाण्याचा साठा असल्याची माहितीही त्यांनी दिली. पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सुभाष शिरोडकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत जलस्त्रोत खात्यातील अधिकारी उपस्थित होते. राज्यातील धरणांमध्ये पुढील दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा असून चिंतेचे कारण नाही. कालव्यांमधून सिंचानासाठीचे पाणी 15 मे पासून बंद केले जाईल. धरणांमधील पाण्याची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. सध्याच्या स्थितीत साळावली धरणात 11 हजार 785 हेक्टर मीटर पाणी आहे. या धरणातून आम्ही रोज 90 हेक्टर मीटर पाणी घेतो. त्या हिशोबाने 130 दिवस पाणी पुरेल एवढे पाणी या धरणात आहे. तिळारी धरणात 12 हजार 567 हेक्टर मीटर पाणी असून या धरणातून रोज 156 हेक्टर मीटर पाणी आम्ही घेतो. चापोली धरणात 460 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. तिथे जास्त पाणी वापरले जात नाही. अंजुणे धरणात 70 दिवस पुरेल एवढे पाणी आहे. आमठाणे धरणात पंपिंग स्टेशन असल्याने कमी जास्त प्रमाणात पाणी असते. ही सर्व स्थिती पाहता पुढील दोन महिने उलटूनही दहा ते पंधरा दिवस पाणी पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडला तरी चिंतेचे कारण नाही, असा दावा शिरोडकर यांनी केला. पंचवाडी धरणात 127 दिवस पुरेल एवढे पाणी आहे या धरणातून रोज 5 ते 8 एमएलडी पाणी घेतले जाते. तेथे 176 हेक्टर मीटर पाणी आहे. गेल्या वर्षी 24 जूनपर्यंत पंचवाडी धरण क्षेत्रात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे हे धरण आटले होते. परंतु यंदा स्थिती समाधानकारक आहे, असे शिरोडकर म्हणाले.

धरणातील पाणी पुरेसे

Advertisement

  • साळावली    130 दिवस
  • तिलारी        144 दिवस
  • आमठाणे    22 दिवस
  • चापोली      447 दिवस
  • अंजुणे       70 दिवस
  • पंचवाडी    170 दिवस

म्हादईवरील बांधकामाची संयुक्त पाहणी होणार

कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविण्यासाठी नव्याने काम सुरू केले असून त्याविरुद्ध गोव्याने केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ‘प्रवाह’ प्राधिकरण गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना सोबत घेऊन संयुक्त पाहणी करणार आहे. ‘प्रवाह’कडून गोव्याला पत्र आले असून संयुक्त पाहणीसाठी तारखा सूचवा असे सांगण्यात आले आहे. यासाठी वेगवेगळ्या तीन ते चार तारखा आम्ही पाठवणार आहोत. तिन्ही राज्यांसाठी संयुक्त अशी तारीख निश्चित कऊन म्हादईच्या ठिकाणी जेथे काम चालू आहे तेथे पाहणी केली जाईल. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने जे काही दस्तऐवज मागितले होते त्याचे संकलन कऊन आम्ही दिलेले आहे. आमचे अधिकारी दर पंधरा ते वीस दिवसांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जातात, असेही शिरोडकर म्हणाले.

Advertisement
Tags :

.