For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘घाई नको’, ओलावा पाहून पेरणी करा

10:19 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘घाई नको’  ओलावा पाहून पेरणी करा
Advertisement

पावसाची चाहूल : रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग : पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेवर भर देण्याची कृषी विभागाची सूचना

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यात पावसाची चाहूल लागताच रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र केवळ पाऊस पडला म्हणून पेरणी न करता जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच मका, हरभरा, गव्हाची पेरणी करावी. विशेषत: बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांची दुष्काळ प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी पेरणीपूर्व बीजप्रक्रियेला विशेष महत्त्व देण्यात यावे. यासाठी शेतकऱ्यांनी घाई न करता जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी करावी, असे आवाहन कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी केले.

मक्मयाचे बियाणे 2 टक्के पॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात 8 तास भिजवून किमान 7 तास सावलीत वाळवावे. त्यानंतर एकरी बियाण्यांवर 6 ग्रॅम गंधक, 15 ग्रॅम ट्याक्रोडर्मा, 200 ग्रॅम अॅझोस्पिरिलम व 200 ग्रॅम फॉस्फरस विद्राव्य जैवखताची प्रक्रिया करून पेरणी करावी. पिकाची वाढ व उत्पादनक्षमता लक्षात घेऊन सुधारित वाणांची निवड करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. हरभऱ्याचे बियाणे 2 टक्के पॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात 30 मिनिटे भिजवावे. त्यानंतर ते किमान 7 तास सावलीत वाळवून एकरी 40 ग्रॅम पॅप्टन किंवा थिरम बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.

Advertisement

पुढील टप्प्यात 500 ग्रॅम रायझोबियम व 500 ग्रॅम फॉस्फरस विद्राव्य जैवखताची प्रक्रिया करून पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गव्हाच्या पेरणीसाठी सिंचनाखालील क्षेत्रात एकरी 60 किलो तर कोरडवाहू क्षेत्रात 20 किलो बियाण्यांचा वापर करावा. सिंचन क्षेत्रातील एक एकरासाठी बियाण्यांवर 240 मिली अॅझोस्पिरिलम द्रवरुप जैवखत व 240 मिली द्रवरुप फॉस्फरस विद्राव्य जैवखताची प्रक्रिया करावी. कोरडवाहू क्षेत्रासाठी एकरी 80 मिली अॅझोस्पिरिलम द्रवरुप जैवखताची प्रक्रिया करून पेरणी करावी.

पावसाची सुऊवात झाल्यानंतर अनेकदा शेतकरी घाईने पेरणी करतात. मात्र जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी केल्यास बियाण्याच्या उगवणीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची स्थिती तपासूनच पेरणी करणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रमाणित बियाणे, योग्य वाण व शिफारशीनुसार बीजप्रक्रिया केल्यास पिकाची सुऊवातीची वाढ चांगली होण्यास मदत होऊ शकते.

रब्बी हंगामात हवामानातील बदलांचा सामना करताना शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. बीजप्रक्रिया, पेरणीचे प्रमाण, वाणांची निवड व इतर तांत्रिक बाबींविषयी अधिक माहितीसाठी जवळच्या शेतकरी संपर्क केंद्राशी किंवा कृषी साहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Advertisement
Tags :

.