For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Monsoon News | घाई, गडबड नको, योग्य पाऊस झाल्यावरच करा खरीप पेरणी

12:20 PM Jun 03, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
monsoon news   घाई  गडबड नको  योग्य पाऊस झाल्यावरच करा खरीप पेरणी
Advertisement
चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरण्यांचा अंतिम निर्णय घ्यावा
सोलापूर : हवामानातील बदल आणि पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी कोणतीही घाई किंवा गडबड करू नये. जमिनीमध्ये पेरणीयोग्य पुरेसा ओलावा आणि चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरण्यांचा अंतिम निर्णय घ्यावा, असा महत्त्वपूर्ण व सकारात्मक सल्ला दक्षिण सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी दिला आहे.
ऐनवेळी बियाणे वाया जाण्याचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधीच योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अवधूत मुळे म्हणाले की, प्रशासकीय नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Advertisement

 
गेल्या वर्षीच्या क्षेत्राचा विचार करता, यावर्षी शेतकऱ्यांचा उत्साह आणि हवामान अंदाज पाहता तालुक्यात खरीप पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर टक्केवारी १५० टक्के अपेक्षित धरण्यात आले असून, कृषी विभाग यासाठी सज्ज आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि पहिल्याच टप्प्यात दर्जेदार उगवण व्हावी यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी ही मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
 
योग्य पाऊस आणि योग्य नियोजनातून यंदाचा खरीप हंगाम अधिक यशस्वी होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. भाजीपाला फुल पिके यामध्ये प्रामुख्याने भाजपालामध्ये कांदा या भाजीपाला पिकाखाली ६५०० हेक्टरवर पेरणी नियोजित आहे. मिरची टोमॅटो वांगी दोडका घेवडा इतर भाजीपाला पिकाचे प्रस्तावित क्षेत्र ५०० हेक्टर आहे.

चालू वर्षी प्रस्तावित असणारे खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र
  • सन २०२६-२७ खरीप हंगाम क्षेत्र
  • तूर : १७५०० हेक्टर
  • मूग : १६०० हेक्टर
  • उडीद : १७५०० हेक्टर
  • सोयाबीन : ७००० हेक्टर
  • बाजरी : १५० हेक्टर
  • मका : १००० हेक्टर

     

     

     

    Advertisement
    Advertisement
    Tags :

    .

    © Copyright, All Rights Reserved.