For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सनातन धर्म, हिंदीभाषिक राज्यांसंबंधी वक्तव्यं करू नका!

06:09 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
सनातन धर्म  हिंदीभाषिक राज्यांसंबंधी वक्तव्यं करू नका

निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस सतर्क : द्रमुकला दिला सल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आगामी लोकसभा निवडणूक पाहता काँग्रेसने स्वत:च्या आघाडीतील सहकारी पक्ष द्रमुकला भविष्यात राजकीय वक्तव्यं करताना सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. हिंदीभाषिक राज्ये तसेच सनातन धर्माचा अपमान करणारी वक्तव्यं करू नका असे काँग्रेसने द्रमुकला सांगितले आहे.

Advertisement

भविष्यात वक्तव्यं करताना अधिक सतर्कता बाळगा असा संदेश काँग्रेसकडून द्रमुकला देण्यात आला आहे. तामिळनाडूत सत्तेवर असलेल्या द्रमुकच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. सनातन धर्माचा अपमान तसेच हिंदीभाषिक राज्यांना गोमुत्र राज्यं असे द्रमुक नेत्याकडून संबोधिण्यात आल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे.

Advertisement

द्रमुकच्या वक्तव्यांसंबंधी काँग्रेसने प्रथम मौन बाळगणेच श्रेयस्कर मानले होते,  काँग्रेसच्या या मौनाला लक्ष्य करत भाजपने 5 राज्यांच्या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. तेलंगणा वगळता तीन हिंदीभाषिक राज्यांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. सनातन धर्माचा अपमान करणारी टिप्पणी काँग्रेसच्या पराभवासाठीचे एक कारण ठरले असल्याचा मतप्रवाह आहे.

द्रमुकमुळे काँग्रेस बॅकफूटवर

द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन धर्मा’संबंधी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला हिंदीभाषिक राज्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षाने सनातन धर्म संपविण्याचे वक्तव्य केले असल्याची आठवण प्रचारात करून दिली होती. सनातन धर्म आणि हिंदू धर्माच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या नेत्यांना काँग्रेसचे समर्थन प्राप्त असल्याची टीका मोदींनी प्रचारसभांमध्ये केली होती.

गोमुत्र राज्य

हिंदीभाषिक 3 राज्यांमध्ये पराभवाचे दु:ख झेलणाऱ्या काँग्रेसची द्रमुकचे खासदार एस. सेंथिल कुमार यांनी अलिकडेच संसदेत  केलेल्या ‘गोमुत्र राज्य’ टिप्पणीमुळे अधिकच कोंडी झाली. यावर काँग्रेसकडून थेट प्रतिक्रिया आली नसली तरीही तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सेंथिल कुमार यांना कठोर शब्दांत फटकारले होते. यानंतर खासदाराने एक वक्तव्य जारी करत माफी मागितली होती.

Advertisement
×

.