पाण्याची कमतरता भासू देऊ नका
अधिकाऱ्यांसाठी झालेल्या प्रशिक्षण शिबिरात रवी बंगारेप्पनवर यांची सूचना
बेळगाव : उन्हाळ्याला सुऊवात झाली असून, आगामी दिवसांत कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची दखल घ्या. जलजीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठा-मलनिस्सारण कार्यक्रमांतर्गत पाण्याचा पुरवठा व त्यासंबंधीची कामे हाती घ्यावीत, अशी सूचना जि. पं. चे योजना संचालक रवी बंगारेप्पनवर यांनी केली. येथील जि. पं. च्या सभागृहात दि. 12 रोजीअधिकाऱ्यांसाठी झालेल्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. ग्रामीण पाणीपुरवठा-मलनिस्सारण खात्याच्या सहकार्याने झालेल्या जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनांच्या योग्यरितीने अंमलबजावणीसाठी सर्व तालुक्यांतील कार्यकारी अधिकारी, पंचायतराज खाते सहसंचालक, पाणीपुरवठा-मलनिस्सारणचे साहाय्यक कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, साहाय्यक अभियंता यांच्यासाठी शिबिर आयोजिले होते.
आरोग्यपूर्ण वातावरण निर्मितीसाठी उत्तेजन द्या
प्रत्येक गाव हागणदारीमुक्त असावे. घन व द्रवऊपी कचरा वेगळा करणे तसेच ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यपूर्ण वातावरण निर्मितीसाठी उत्तेजन द्यावे, अशी सूचनाही बंगारेप्पनवर यांनी केली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व नियोजन, आदर्श गावांची घोषणा, 24 तास पाणीपुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा-मलनिस्सारण समित्यांची रचना, त्यांची जबाबदारी, वॉटर मीटर मॅनेजमेंट, पाणीपुरवठा- मलनिस्सारण संदर्भातील समस्या, पाणीपट्टी शिबिरात चर्चा झाली. आरडब्लूएसचे बेळगाव विभाग कार्य. अभियंता शशिकांत नायक, चिकोडी विभाग कार्यकारी अभियंता पांडुरंग राव, जि. योजना व्यवस्थापक, जि. समालोचक, कर्चचाऱ्यांचा शिबिरात सहभाग होता.