For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानी दहशतवाद्यांना घुसू देऊ नका!

06:30 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानी दहशतवाद्यांना घुसू देऊ नका
Advertisement

डच नेत्याकडून भारताला समर्थन

Advertisement

वृत्तसंस्था/ अॅमस्टरडॅ

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेवर आता नेदरलँडमधील उजव्या विचारसरणीचे नेते आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

रियासी येथील हल्ल्यासाठी गीर्ट यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबाबदार ठरविले आहे. हिंदूंना मारण्यापासून रोखण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात घुसू देऊ नका. भारताने स्वत:च्या लोकांना वाचवावे असे म्हणत गीर्ट यांनी ‘हॅशटॅग ऑल आइज ऑन रियासी’ असे नमूद केले आहे.

रियासीमध्ये दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर गोळीबार केला होता. यामुळे बस अनियंत्रित होत खोल दरीत कोसळली होती. बसवर गोळीबार करणारे दहशतवादी हे पर्वतीय भागात लपून बसले आहेत. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी गट टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दहशतवाद्यांनी मागील एक महिन्यात राजौरी आणि पुंछमध्ये देखील अनेक हल्ले घडवून आणले आहेत. रियासी येथे हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानी होते असे मानले जात आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हा समूह पीर पंजाच्या दक्षिण हिस्स्यात मागील दोन वर्षांपासून सक्रीय आहे.

Advertisement
Tags :

.