For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाबोळीबाबत विरोधकांच्या अफवांना बळी पडू नका

01:05 PM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
दाबोळीबाबत विरोधकांच्या अफवांना बळी पडू नका
Advertisement

विमानतळ कधीच बंद पडणार नाही : विश्वजित

Advertisement

पणजी : दाबोळी विमानतळ ही राज्याची ओळख आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळ कदापि बंद होणार नाही. जनतेने कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. दाबोळी विमानतळ बंद करणार, ही अफवा विरोधकांकडून पसरविण्याचे काम अधूनमधून केले जात आहे. सध्या निवडणुकीतही काँग्रेसकडे काहीच मुद्दे नसल्याने या विमानतळाची अफवा पसरवून मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र जनतेने लक्ष देऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले. दाबोळी विमानतळाला कोणताही धोका नसल्याचे राणे यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून गोव्याला विकासकामांसाठी भरीव आर्थिक मदत मिळत आहेत. या आर्थिक मदतीच्या जोरावर आम्ही राज्यात वेगवेगळे प्रकल्प पूर्णत्वास आणले, असे विश्वजित राणे म्हणाले. जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणणे हाच भाजपचा ध्यास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळे 350 कोटी ऊपये खर्च करून कर्करोग निदान इस्पितळाचे काम सुरू झाले. टाटा मेमोरियलच्या सहकार्याने बांबोळी इस्पितळात कर्करोग झालेल्या ऊग्णांवर उपचार व्हावेत, यासाठी ओपीडी सुरू करण्यात आली. यासाठी सुमारे 50 परिचारिका प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहितीही आरोग्यमंत्री राणे यांनी दिली. गेल्या दहा वर्षांत जी विकासकामे झाली आहेत, ती काँग्रेसच्या काळातील कैकपटीने पुढे आहेत. गोवा हे ‘डेस्टिनेशन’ केंद्र बनावे यासाठी केंद्र सरकारने जागतिक परिषदा यासाठीही निधी दिला. त्याचा फायदा पर्यटनदृष्टाdया होत आहे. गोवा राज्याचा सर्वांगीण विकास हा भाजपमुळेच होत असल्याचा दावा आरोग्यमंत्री राणे यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची गोव्याला नेहमीच साथ

Advertisement

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोवा हे राज्य लहान असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याला यापुढेही काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिल्याने पंतप्रधान मोदी यांची गोव्याला नेहमीच साथ लाभलेली आहे, हे स्पष्ट होते. दक्षिण व उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. मोदी सरकारने देशासाठी केलेल्या कार्याची आणि सावंत सरकारने राज्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन जनता भाजपच्या उमेदवारांना साथ देईल, असा विश्वास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.