माझ्या बायकोचे नाव यात ओढू नकाः राज कुंद्राची विनंती
मुंबई
उद्योगपती राज कुंद्रा याच्या घरावर सक्तवसुली संचलनालय (ईडी) चा छापा पडला आहे. राज कुंद्रा यांच्याशी संबंधित मुंबई, उत्तर प्रदेशातील विविध १५ ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. या दरम्यान सर्वत्र शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अशी चर्चा होऊ लागली आहे. यावर राज कुंद्रा याने सोशल मिडीया वर पोस्ट शेअर करुन या प्रकरणात माझ्या बायकोचे नाव ओढू नका अशी विनंती केली आहे.
राज कुंद्राची पोस्ट-
''ज्यांच्यासाठी तो कधीही चिंता करू शकतो"
"तर माध्यमांना नाटकाची चणचण भासतेच. पण काही तथ्य समोर आणणं गरजेचं आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या तपासाचे मी पूर्णपणे सहकार्य करत आहे. 'असोसिएट्स', 'पोर्नोग्राफी' आणि 'मनी लॉन्ड्रिंग'च्या दाव्यां करण्यांबद्दल, आपण एवढेच म्हणूया की कितीही सनसनाटीपणा केली तरी सत्य लपत नाही, शेवटी, न्यायचाच विजय होईल."
मीडियासाठी एक टीप-
"माझ्या पत्नीचे नाव असंबंधित प्रकरणांमध्ये वारंवार ओढणे याचा मी अस्वीकार करते. कृपया सीमांचा आदर करा."
अशी पोस्ट करून हॅशटॅग ईडी असेही लिहीले आहे.
२०२१ मध्ये राज कुंद्राला अटक झाली होती. दोन महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये त्याला जामीन मंजूर झाला. यासंदर्भात ईडी कडून परदेशातील आर्थिक व्यवहारांचाही शोध घेतला जात आहे. तसंच कुंद्रा वर बिटकॉईन स्किमप्रकरणीही तपास सुरु आहे. याच वर्षी एप्रिलमध्ये यंत्रणेकडून बिटकॉईन गुंतवणूक फसवणूक प्रकरणामध्ये त्याची ९७.७९ कोटीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.