For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : ओबीसी गरीब महिला उमेदवाराला बदनाम करू नका अन्यथा... ; अभयराजे चालुक्यांचा इशारा

06:29 PM Dec 15, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   ओबीसी गरीब महिला उमेदवाराला बदनाम करू नका अन्यथा       अभयराजे चालुक्यांचा इशारा
Advertisement

                    खासदार ओमराजे निंबाळकर यांना सभापती अभयराजे चालुक्य यांचा इशारा

Advertisement

उमरगा : ओबीसी गरीब महिला उमेदवाराला बदनाम करू नका. जनतेने तुम्हाला सर्वसामान्य ओबीसी महिला उमेदवारास हसीना पारकर म्हणण्यासाठी निवडून दिलेलं नाही. राक्षसी महत्वाकांक्षा असलेल्या लोकांचं ऐकून जर एक कुटुंब उध्वस्त करत असाल तर ते धोकादायक आहे. निश्चितच त्याचे परिणाम तुम्हाला आता व भविष्यात भोगावे लागतील, असा इशारा माजी सभापती अभयराजे चालुक्य यांनी दिला.

उमरगा नगरपरिषद निवडणुकीतील तीन प्रभागांतील निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच राजकीय वातावरण तापलेले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच एक पत्र दिले. त्यामध्ये, एका महिला उमेदवार “मी हसीना पारकर आहे” असे सांगून मतदारांना धमकावत आहेत आणि “मला मतदान करा” असा प्रचार करत आहेत. या परिस्थितीत मतदार पूर्ण दहशतीखाली आहेत, असा उल्लेख केला होता. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.