महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वाढदिवसाचा बडेजाव शाळांमध्ये नको

11:21 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विद्यार्थ्यांत न्यूनगंड : राज्य सरकारकडून बंदी

Advertisement

बेळगाव : सरकारी आणि खासगी शाळांमध्ये विद्यार्थी तसेच नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्याचे फॅड वाढले होते. त्यामुळे शिक्षणापेक्षा झगमगाटाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला होता. हे प्रकार थांबविण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला असून नवीन नियमावली तयार केली आहे. यापुढे कोणत्याही सरकारी अनुदानित अथवा खासगी शाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्यावर बंदी घालण्याचा आदेश बजावण्यात आल्याने वाढदिवसाच्या नावाखाली दाखविला जाणारा बडेजाव आता दिसणार नाही.शाळांमध्ये विद्यार्थी तसेच समाजातील इतर व्यक्तींचे वाढदिवस साजरे करण्यात येत होते. केवळ फोटोसाठी काही ठिकाणी असे प्रकार होत असल्याचे दिसून आले. शाळांमधील विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर काही विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ लागला.

Advertisement

इतर विद्यार्थ्यांप्रमाणे आपलाही शाळेमध्ये मोठ्याने वाढदिवस साजरा व्हावा, सर्वांना केक व चॉकलेटचे वाटप व्हावे, यासाठी स्पर्धा सुरू झाली. याचा आर्थिक फटका पालकांना बसू लागल्याने या प्रकारांना आळा घालणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत होते.काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सरकारी, खासगी तसेच अनुदानित शाळांमध्ये वाढदिवस साजरा करण्यावर बंदी आणली. यापूर्वी निवासी शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये वाढदिवस साजरे करण्यावर बंदी आणण्यात आली होती. केवळ राष्ट्रीय सण, राज्यातील सण व जयंत्यांव्यतिरिक्त इतर कोणतेही उत्सव साजरे न करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. खासगी शाळांमध्ये राजकीय व्यक्ती, अधिकारी, तथाकथित समाजसेवक यांचे वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरे करून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले जात होते. मात्र, यामुळे शिक्षणाऐवजी इतर गोष्टींवरच विद्यार्थ्यांचा भर वाढत असल्याने अशा प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. या निर्णयाचे समाजाच्या सर्व थरातून स्वागत होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article