For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यातील विकासकामांत श्रेयवाद आणू नये

10:26 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यातील विकासकामांत श्रेयवाद आणू नये
Advertisement

माजी आमदार अरविंद पाटील यांचे पत्रकार परिषदेत आवाहन

Advertisement

खानापूर : शहर तसेच तालुक्यात विकासकामे राबवताना कुणीही श्रेयवाद आणून विकासकामात अडथळा आणू नये, प्रत्येकवेळी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळानंतरच काही विकासकामे पूर्ण होतात. मात्र या कामाबाबत श्रेयवाद आणून वाद निर्माण करू नये, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनीच राजकारण बाजूला सारुन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वक्तव्य माजी आमदार अरविंद पाटील यांनी भाजपच्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, तालुकाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सेक्रेटरी बसवराज सानिकोप, गुंडू तोपिनकट्टी, सुरेश देसाई, पंडित ओगले, सुनिल मड्डीमणी, मारुती पाटील, शंकर पाटील, दिलीप सोनटक्के यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरात नव्याने हायटेक बसस्थानक तसेच माता शिशू दवाखाना आणि हेस्कॉमच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार दि. 12 रोजी होणार आहे. यावरुन माजी आमदार अंजली निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागील काळात विकासकामे मंजूर करण्यात आलेली आहेत. त्याचे उद्घाटन आताचे आमदार करत आहेत. 1 वर्षात विकासकामासाठी काहीही निधी मंजूर करण्यात आलेल्या नसल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याबाबत भाजपकडून खुलासा करण्यात आलेला आहे.

Advertisement

सर्वजण मिळून विकासकामे करू

याबाबत पुढे बोलताना माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, हे हायटेक बसस्थानक माझ्या कार्यकाळात मंजूर झाले होते. मात्र फेसवन फेसटूच्या कचाट्यात सापडल्याने याला मंजुरी उशीरा मिळाली आहे. मात्र मी यासाठी प्रयत्न केल्याचा गाजावाजा कुठेही केलेला नाही. माझ्या कार्यकाळात अनेक विकासकामे मंजूर झालेली होती. त्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र त्यानंतर झालेल्या आमदारांनी याचे पूजन आणि उद्घाटन केले आहे. असे असताना शहरासह तालुक्याच्या विकासकामांबाबत श्रेयवाद आणून विकासकामाला अडथळा आणू नये, तालुक्याच्या विकासकामात सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी प्रयत्न करुया.

आता काँग्रेसचे सरकार राज्यात आहे. काँग्रेस सरकारकडून तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, दि. 12 रोजी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून विकासकामांसाठी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. याप्रसंगी प्रमोद कोचेरी यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत शासनाकडे सतत पाठपुरावा करून शेतकऱ्यांना निश्चित भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, तसेच टोलनाक्याच्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून टोलवसुली रस्ताकाम पूर्ण होईपर्यंत थांबविण्यात यावी, अशी विनंती करण्यात येईल, असे सांगितले.

विकासासंबंधी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच

शहराच्या विकासासंदर्भात लवकरच माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी यासह शहराच्या विकासासंबंधी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल. या बैठकीत शहराच्या विकासासंदर्भात सखोल चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आमदार विठ्ठल हलेगकर यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :

.