For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘डोंट बी शाय’ ओटीटीवर येणार

06:09 AM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘डोंट बी शाय’ ओटीटीवर येणार
Advertisement

आलिया भट्ट आता एक यशस्वी निर्माती देखील ठरणार आहे. डार्लिंग्स आणि जिगरा या चित्रपटानंतर आता आलिया स्वत:चा नवा चित्रपट ‘डोंट बी शाय’सोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर परत येत असून यात तिने अनेक नव्या चेहऱ्यांना लाँच केले आहे. डोंट बी शाय या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Advertisement

या ट्रेलरची सुरुवात ‘शाय’ने होते, जिचे परिपूर्ण आयुष्याचे प्लॅन ठरले आहेत. स्वत:च्या जगाला परिपूर्ण मानणारी शायच्या आयुष्यात अचानक गोष्टी विचित्र वळणं घेऊ लागताच तिचे जग विखुरण्यास सुरुवात होते. ती स्वत:ला या गुंतागुंतीतून बाहेर काढू लागताच आपण श्रीमंत युवक मयंक आणि स्वत:चा बालपणीचा मित्र ध्रूव यांच्यात अडकून पडल्याचे तिला जाणवते. याचदरम्यान शायची मैत्रिण ताराची एंट्री आणखी गुंतागुंत वाढविते. अशाप्रकारे शायचा प्लॅन मार्गावरून हटताना दिसून येतो. प्रेमातील गुंतागुंत, मैत्री आणि आयुष्यातील उलथापालथीला ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.

आलिया भट्ट आणि शाहीन भट्टच्या इटरनल सनशाइन प्रॉडक्शनकडून निर्मित या चित्रपटात आरुषी बजाज, पीयूष खाती, बियांका अरोडा आणि अंश डुग्गल हे नवे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याचबरोबर कुणाल रॉय कपूर, अनुराग बासू, नेहा धूपिया आणि अंजू आल्वा नाइक देखील दिसून येणार आहे. या चित्रपटाची कहाणी श्रीती मुखर्जीने लिहिली असून तिनेच दिग्दर्शन पेले आहे. हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.