For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घाबरु नका...पळू नका !

06:10 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
घाबरु नका   पळू नका
Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला परंपरागत अमेठी मतदारसंघ सोडून आपल्या मातेचा रायबरेली मतदारसंघ निवडल्याने भारतीय जनता पक्षाच्या हाती आयते कोलीत मिळाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधी यांच्या या निवडीवर टोला लगावताना, ‘घाबरु नका आणि पळूही नका,“ अशी टिप्पणी एका प्रचारसभेत भाषण करताना केली आहे.

Advertisement

राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही उमेदवार आहेत. तेथील मतदान पार पडल्यानंतर त्यांनी आता रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. ‘वायनाड मतदारसंघात आपला पराभव होईल, अशी चिंता युवराजांना सतावत आहे. त्यामुळे ते अन्य मतदारसंघाच्या शोधात आहेत,“ हे मी आधी स्पष्ट केलेच होते. माझे अनुमान खरे ठरले आहे. इतके दिवस काँग्रेसचे नेते लोकांना भिऊ नका, असा संदेश देत होते. आता आम्ही त्यांना घाबरु नका आणि पळूही नका, असा संदेत देत आहे, असे प्रतिपादन त्यांनी पश्चिम बंगालमधील बर्धमान मतदारसंघात भाषण करताना शुक्रवारी केले.

अमेठीमध्येही धोका

Advertisement

राहुल गांधी यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून पराभव झाला होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांना पराभूत केले होते. आता पुन्हा इराणी यांना अमेठीची उमेदवारी दिल्याने राहुल गांधी यांनी त्यांच्यासमवेतचा संघर्ष टाळून रायबरेली हा मतदारसंघ निवडला, अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी केली. गांधींना आणखी एक मतदारसंघ हवाच होता, तर त्यांनी अमेठीत स्मृती इराणी यांच्याशी संघर्ष करण्याचा निर्धार करायचा होता, अशी प्रतिक्रिया सोशल मिडियावरही अनेकांनी दिली आहे.

मुस्लीमांच्या आरक्षणासाठीची योजना

भारताच्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नाही. मात्र, काँग्रेसची योजना घटनेत बदल करुन सर्व मुस्लीमांना आरक्षण देण्याची आहे. मात्र, ते उघडपणे मतदारांना सांगण्याची या पक्षाची तयारी नाही. मुस्लीमांना सरसकट आरक्षण देण्यासाठी घटनेत बदल करणार नाही, असे लेखी आश्वासन काँग्रेसने दिले तरच, लोकांचा या पक्षावर विश्वास बसेल, असे आवाहनही त्यांनी दिले.

Advertisement
Tags :

.