महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

परंपरेला गालबोट लागेल असे कृत्य करू नका

11:03 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

येळ्ळुरातील शांतता समिती बैठकीत पोलीस निरीक्षकांचे आवाहन 

Advertisement

वार्ताहर/येळ्ळूर

Advertisement

आपल्या सण, समारंभामध्ये आपली संस्कृती व परंपरा दडल्या आहेत. त्याला गालबोट लागेल असे कोणतेच कृत्य करू नका, असे येळ्ळूर येथे झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन व शांतता बैठकीत वडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर होत्या. बेळगाव व परिसरातील गणेशोत्सव हा कर्नाटकात प्रसिद्ध आहे. हा नावलौकिक तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर आणि राबवल्या जाणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मिळविला आहे. लहान थोर आणि महिला यानाही या उत्साहाचा आनंद लुटता यावा, काटेकोर नियमांचे पालन, शिस्त आणि शांततेत उत्सव साजरा करा, शरीरावर आणि मनावर आघात करणाऱ्या डॉल्बीसारख्या वाद्यांना फाटा देत परंपरागत वाद्यांच्या गजरात वेळेत गणेशाचे आगमन आणि विसर्जन करा.

अनाठायी आणि वायफळ खर्च टाळून सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करा, मुला मुलींसह महिलांच्याही कलागुणांना वाव द्या, कोणतीही समस्या निर्माण झाली तर सरळ आपल्याशी संपर्क साधावा, पोलीस बंदोबस्तात सण साजरे करणे हे भूषणावह नाही, असे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. गणेशोत्सव साजरा करताना मंडळानी हेस्कॉम खात्याची परवानगी अग्निशमन यंत्र व त्या खात्याला माहिती, पोलीस खात्याची परवानगी, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव यांच्या परवानगी आवश्यक असून या एक खिडकी कार्यक्रमाद्वारे पोलीस ठाण्यात परवानगींची सोय केली असल्याचेही सांगितले. आपल्या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व विभागांचा चांगला असून तो आपण तसाच टिकवूया, मान सन्मान व स्पर्धा विसरुन गणेशाचे महत्व राखत शांततेत आणि धार्मिक वातावरणात हा उत्सव साजरा करून सहकार्य करुया, असे ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आभार मानताना सांगितले. प्रास्ताविक एस. आर. मराठे यांनी केले. यावेळी मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article