For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्समध्ये गाढवांना घातला जातो पजामा

06:28 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्समध्ये गाढवांना घातला जातो पजामा
Advertisement

माणसांसारखी पँट किंवा पजामा घालून गाढव एखाद्या ठिकाणी फिरत असल्याची कल्पना तुम्ही करू शकता का? फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यावर ला रोशेलनजीक स्थित इल-दे-रे नावाचे अत्यंत सुंदर बेट आहे. हे बेट स्वत:च्या वाळूयुक्त किनारे, शांत वातावरण आणि थंड वाऱ्यांसाठी पर्यटकांदरम्यान अत्यंत प्रसिद्ध आहे. परंतु या बेटाची सर्वात अनोखी ओळख तेथील गाढवं आहेत. ही गाढवं रंगबिरंगी अन् चेकदार पँट परिधान करत रस्ते अन् उद्यानांमध्ये फिरताना दिसून येतात. या गाढवांना एन्स एन कुलोट म्हणजेच पँट घातलेले गाढव म्हटले जाते.

Advertisement

ही काही सामान्य गाढवं नाहीत, तर ही गाढवांच्या सर्वात मोठ्या आणि दुर्लभ प्रजातींपैकी एक पॉइटौ प्रजातीची आहेत. फ्रान्सच्या पॉइटौ क्षेत्राशी संबंधित या गाढवांचे सर्वात मोठे वैशिष्ट्या त्यांचे भरभक्कम शरीर आणि त्यावर लटकणारे दाट केस आहे, ज्यांना कादानेत म्हटले जाते. स्वत:ची शक्ती अन् लांब शरीरामुळे प्राचीन काळात या गाढवांचा वापर इल-दे-रे बेटाच्या मिठागरांमध्ये आणि शेतांमध्ये भार वाहून नेण्यासाठी केला जात होता. ही गाढवं मिठाच्या दलदलयुक्त मैदाने आणि शेतांमध्ये काम करायची, तेव्हा चिखलात पैदास होणारे विषारी मच्छर अन् किडे त्यांच्या पायांना चावून त्यांना आजारी करत होते. किड्यांची चावा घेतल्याने गाढवांच्या पायांमध्ये गंभीर इंफेक्शन व्हायचे.

या समस्येवर अनोखा तोडगा काढत त्यांच्या मालकाने जुने पडदे असलेले कापड किंवा गादीच्या कव्हरला धारीदार कपड्यांनी गाढवांच्या चारही पायांसाठी पजामा शिवण्यास सुरुवात केली. कामावर जाण्यापूर्वी दररोज सकाळी गाढवांना ही पॅँट घातली जात होती. परंतु यांत्रिकीकरणामुळे मिठागरांमध्ये या गाढवांकडून काम करवून घेतले जात नाही. तरीही ही परंपरा आजही पूर्णपणे जिवंत आहे. परंतु आता याचा उद्देश बदलला आहे. आता गाढवांना शेतीसाठी नव्हे तर या ऐतिहासिक परंपरेला जिवंत ठेवणे आणि बेटावर येणारे पर्यटक तसेच मुलांना आकर्षित करण्यासाठी पँट घातली जाते.

Advertisement

बेटाच्या सेंट-मार्टिन-दे-रे स्थित बारबेट पार्कमध्ये पर्यटकांना एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान या पँट घातलेल्या गाढवांना पाहता येते. त्यांच्यासोबत छायाचित्रे काढून घेता येतात आणि त्यांची सवारीही करता येते. पॉइंटौ गाढवांच्या संरक्षणाच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या संख्येत सुधारणा झाली आहे.

Advertisement
Tags :

.