For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवेश्वरकर बंधूंकडून अंगडी हायस्कूलला बेंचची देणगी

10:16 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवेश्वरकर बंधूंकडून अंगडी हायस्कूलला बेंचची देणगी
Advertisement

कारवार : मूळचे कारवार तालुक्यातील अंगडी गावचे आणि सद्या मुंबई येथे वास्तव्य करून असलेल्या दानशूर आणि समाजसेवक सतीश शेटीया शिवेश्वरकर आणि सुभाष शेटीया शिवेश्वरकर बंधुंनी आपले आई-वडील दिवंगत महाबळेश्वर एच. आणि गिरीजाबाई एम. एस. शिवेश्वरकर यांच्या स्मरणार्थ अंगडी येथील सेकंडरी इंग्लिश माध्यमिक शाळेला 15 डेस्क आणि बेंच देणगीदाखल दिले. देणगीबद्दल माध्यमिक शाळा व्यवस्थापन कमिटी, शाळेच्या कर्मचारी वर्गाने आणि विद्यार्थ्यांनी शिवेश्वरकर बंधुंचे आभार मानले. शिवाय शेटीया शिवेश्वरकर कुटुंबातील अंगडी येथे वास्तव्य करून असलेल्या हरीष शेटीया यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक, उपाध्यक्षा शांता नाईक, कार्यदर्शी विलास देसाई, मुख्याध्यापक उमेश दोडमनी, शरद यरंडेकर, किरण शेठ, उदय दुबे आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.