डोनाल्ड ट्रम्प यांच्या जावयाचा फोन हॅक
06:33 AM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
Advertisement
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि माजी वरिष्ठ सल्लागार, जेरेड कुशनर यांचा फोन हॅक झाल्याचा दावा केला जात आहे. ते सध्या आखाती देशांशी संबंधित कथित गुप्त आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर आरोपांचा सामना करत आहेत. व्हॅनिटी फेअरच्या एका अहवालानुसार, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात डच गुप्तहेरांनी कुशनरच्या आयफोनवरील हालचालींवर पाळत ठेवली होती. या अहवालात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इस्रायलच्या नेत्यांशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांचा दावा करण्यात आला आहे. तथापि, या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही.
Advertisement
Advertisement
