For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत मोठी घट

07:00 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत मोठी घट
Advertisement

केवळ 34 टक्के लोक कामगिरीवर खूश

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता दिवसेंदिवस घटत असल्याचे दिसते. रॉयटर्स-इप्सोसच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, केवळ 34 टक्के अमेरिकन नागरिक त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. त्यांच्या सध्याच्या कार्यकाळातील ही सर्वात कमी पातळी आहे. जानेवारी 2025 मध्ये जेव्हा त्यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा त्यांना 47 टक्के पाठिंबा मिळाला होता. तेव्हापासून यात सातत्याने घट होत आहे. या घसरणीचे सर्वात मोठे कारण महागाई आहे. वाढत्या किमती हाताळण्याच्या त्यांच्या पद्धतीवर केवळ 22 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. पेट्रोलच्या किमतींमुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस युद्ध सुरू झाल्यापासून, इंधन 40 टक्केपेक्षा जास्त महाग झाले आहे. ज्याचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होत आहे. अर्थव्यवस्थेवरील ट्रम्प यांचे अनुमोदन रेटिंग 27 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. ही टक्केवारी त्यांच्या पहिल्या कार्यकाळापेक्षाही कमी आहे. त्याचबरोबर इराणसोबतच्या संघर्षावर 34 टक्के लोक त्यांना पाठिंबा देतात. रिपब्लिकन समर्थक त्यांच्यासोबत असले तरी पक्षात महागाईबद्दलची नाराजी वाढत आहे. अपक्ष मतदार आता डेमोक्रॅट्सकडे झुकत असून आगामी निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

Advertisement

Advertisement
Tags :

.