महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदी यांना भेटणार डोनाल्ड ट्रम्प

06:04 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्वाड संघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने होणार दौरा

Advertisement

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 21 ते सप्टेंबर 23 या काळात अमेरिकेचा दौरा करणार आहेत. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांनी स्थापन केलेल्या ‘क्वाड’ या संघटनेची बैठक अमेरिकेत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आहे. या दौऱ्यात ते अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा एका जाहीर कार्यक्रमात केली आहे. ट्रम्प यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतरच्या त्यांच्या प्रथम जाहीर कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी कौतुकोद्गार काढले आहेत. तसेच ते पुढील आठवड्यात अमेरिकेत येतील, त्यावेळी ते मला भेटणार आहेत, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

बायडेन यांच्याकडून आयोजित

क्वाडची ही परिषद अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्याकडून आयोजित करण्यात आली आहे. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे वातावरण असताना ही परिषद होत आहे. अमेरिकेतील डेल्वेअर येथील विल्मिंग्टन येथे ही परिषद होणार असून चार देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

भाषणही करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत भाषणही करणार आहेत. क्वाड ही संघटना भारत-प्रशांतीय क्षेत्रात शांततामय वातावरण असावे आणि तेथे कोणत्याही देशाला एकाधिकार गाजवता येऊ नये, यासाठी स्थापन करण्यात आली आहे. व्यवहारत: ती चीनच्या आक्रमक विस्तारवादाला आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. पण तसा स्पष्ट उल्लेख या संघटनेकडून केला जात नाही. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर जोसेफ बायडेन यांना अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील ही अखेरची परिषद आहे.

अमेरिकेत 5 नोव्हेंबरला मतदान

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अमेरिकेत येत्या 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उमेदवार असून डेमॉक्रेटिक पक्षाच्या वतीने कमला हॅरिस उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीचा संघर्ष अपेक्षित असून या निवडणुकीच्या निर्णयाचा परिणाम जगातील राजकीय घडामोडींवर होत असल्याने या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे.

पंतप्रधान मोदी सर्वात लोकप्रिय

सप्टेंबरच्या प्रारंभी ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. जुलैच्या 4 ते 8 या कालावधीत हे जागतिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार लोकप्रियतेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकावर असून त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमाण 69 टक्के आहे. द्वितीय क्रमांकावर मेक्सिकोचे अध्यक्ष अंद्रेस मॅन्युअल लोपाझ ओब्राडोर आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article