डोनाल्ड ट्रम्पनी पाठविली कॅलिफोर्नियात सेना
वृत्तसंस्था / लॉस एंजल्स
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात मोठा हिंसाचार आणि जाळपोळ होत आहे. अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांच्या स्थलांतरित विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जात असून त्या निदर्शनांचे पर्यवसान हिंसाचार आणि जाळपोळ यात होत आहे. हा हिंसाचार रोखण्यासाटी ट्रम्प यांनी अमेरिकेची सेना या राज्यात पाठविली आहे. त्यामुळे नवा विवाद निर्माण झाला आहे.
कॅलिफोर्निया प्रांताच्या सरकारची अनुमती न घेताच ही सेना पाठविण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. अमेरिकेच्या संघराज्यीय व्यवस्थेनुसार असे करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नाही, असे काही तज्ञांचे मत आहे. तथापि, तत्काळ कारवाई करण्याची वेळ आल्यास राष्ट्राध्यक्ष अशी कृती करु शकतात, असाही अन्य तज्ञांचा विचारप्रवाह आहे. तथापि, कॅलिफोर्निया प्रशासनाने आम्ही निदर्शने रोखण्यास समर्थ आहोत, असे प्रतिपादन रविवारी केले आहे.