For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलं गोल्डन कार्ड

02:55 PM Feb 26, 2025 IST | Pooja Marathe
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलं गोल्डन कार्ड
Advertisement

४३ कोटींमध्ये घ्या अमेरिकेचे नागरिक्तव ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकत्व देण्यासाठी आता गोल्ड कार्डस् नावाची नवी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना अमेरिकेचे नागरिकत्व मिळवता येणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सुत्री हाती घेतल्यानंतर अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मोहीम सुरु करण्यात आली होती. भारतातील अवैध स्थलांतरितांना घेऊन तीन विमाने आली आहेत. त्यानंतर मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येईल, अशी घोषणा केली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींना ५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच साधारण ४३ कोटी रुपये भरुन अमेरिकेचे गोल्ड कार्ड विकत घेता येऊ शकते. आधीच्या ग्रीन कार्डच्या जागी आता गोल्ड कार्डस् आले आहे. मंगळवारी ओव्हल ऑफीसमध्ये बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नवी घोषणा केली.ओव्हल ऑफीसमध्ये पत्रकारांशी बोलत असताना ट्रम्प म्हणाले की, आता गोल्ड कार्ड हे आधीच्या EB-5 (ग्रीन कार्ड) योजनेची जागा घेणार आहे. या माध्यमातून गोल्ड कार्डस घेणाऱ्यांना अमेरिकेचे कायमस्वरुपी नागरिकत्व दिले जाईल. गोल्ड कार्डस धारकांना ग्रीन कार्डप्रमाणेच लाभ मिळू शकणार आहेत. या योजनेबद्दलची अधिक माहिती दोन आठवड्यात जाहीर करू, असेही ते यावेळी म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.