For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ranveer Singh | डॉन ३' चा वाद न्यायालयात! कामावर बंदी घालणाऱ्या फेडरेशनविरोधात अभिनेता रणवीर सिंग आक्रमक

01:13 PM Jun 03, 2026 IST | NEETA POTDAR
ranveer singh   डॉन ३  चा वाद न्यायालयात  कामावर बंदी घालणाऱ्या फेडरेशनविरोधात अभिनेता रणवीर सिंग आक्रमक
Advertisement

                          रणवीर सिंगचा पलटवार; FWICE विरोधात थेट कायदेशीर लढाई

Advertisement

मुंबई - गेले बरेच दिवस झाले अभिनेता रणवीर सिंग चांगलाच चर्चेत आहे.... ‘डॉन 3’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद काही शांत होताना दिसत नाहीये.बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता सुपरस्टार रणवीर सिंह आणि ' फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज ' यांच्यातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. 'डॉन ३' चित्रपटातून अचानक घेतलेल्या एक्झिटमुळें FWICE नं रणवीरविरोधात 'असहकार्याचा आदेश' म्हणजेच त्याच्यासोबत काम न करण्याचा आदेश काढलाय. ही एक प्रकारे बंदी आहे, असंही म्हटलं गेलं. या कारवाईला आता रणवीर सिंहनं काय उत्तर देनार याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले होते...यावर आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे... या 'असहकार्याचा आदेशावर रनवीरने कायदेशीर उत्तर द्यायचे ठरवले आहे... रणवीरने थेट ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ला (FWICE) कायदेशीर नोटीस पाठवत त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, रणवीरने फेडरेशनला ही नोटीस त्याच्याविरोधात जारी केलेल्या ‘नॉन को-ऑपरेशन डायरेक्टिव्ह’ म्हणजेच असहकाराच्या आदेशाप्रकरणी पाठवली आहे. या फेडरेशनने त्याच्या सर्व सदस्यांना रणवीरसोबत यापुढे कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर रणवीरच्या कायदेविषयक टीमने 2 जून रोजी फेडरेशनला नोटीस पाठवली आहे. मात्र या नोटिशीत त्याने नेमकं काय म्हटलंय किंवा फेडरेशनकडे कोणती मागणी केली आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र रणवीरच्या या कारवाईमुळे ‘डॉन 3’चा वाद आणखी चिखऴण्याची शक्यता निर्माण झाली आहे..

Advertisement

नेमकं काय आहे प्रकरण?
रणवीरने 2023 मध्ये फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारली होती. या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली होती. मात्र ‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीरचे फरहानसोबत काही मतभेद झाले. त्यानंतर शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी त्याने अचानक चित्रपटातून माघार घेतली. यामुळे फरहान अख्तर आणि निर्मात्यांचं मोठं नुकसान झालं. चर्चेतून हा मुद्दा सोडवला न गेल्याने अखेर फरहानने फेडरेशनकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर फेडरेशनने रणवीरला त्याची बाजू मांडण्यासाठी दर दहा दिवसांनी एक असे तीन नोटीस पाठवले होते. मात्र त्यावर कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने अखेर त्यांनी रणवीरविरोधात असहकाराचे आदेश जारी केले.

Advertisement
Tags :

.