महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विभागीय शालेय सायकलिंग स्पर्धेत कोल्हापूर व सांगली जिल्हयातील सायकलपट्टूचे वर्चस्व

11:45 AM Dec 31, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

उत्रे प्रतिनिधी

Advertisement

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय शालेय सायकलिंग स्पर्धेत कोल्हापूर व सांगली जिल्हयातील खेळाडूने वर्चस्व राखले. ही स्पर्धा गिरोली ता.पन्हाळा येथे झाल्या. गिरोलीच्या सरपंच सौ. छाया गुरव यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. तालुका क्रीडा अधिकारी अभय देशपांडे, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, कोडोलीचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड उपस्थित होते. स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्हातील 250 सायकलपटू सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी सर्व बक्षिसे पेंडाखळे ता.शाहुवाडीचे माजी सरपंच युवराज पाटील यांच्या देणगीतून देण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी अरुण पाटील, कपील कोळी, गोरख कोळी व प्रकाश ठाणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. रघू पाटील, भीवाजी काटकर, आर.बी.पाटील, यशवंत शेवाळे, बाजीराव फिरिंगे, विकास दळवी यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Advertisement

स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक खालील प्रमाणे:

टाइम ट्रायल प्रकार 14 वर्षे मुले: महमंदफज़ल चिकोडे (कोल्हापूर), दानिश जमादार (सांगली), आयुष रानमळे (सातारा),14 वर्षे मुली: श्रावणी करांडे (सांगली), प्रज्ञा जाधव (कोल्हापूर), अंकिता पुजारी (सांग‌ली),17 वर्षे मुले: सिध्देश घोरपडे (कोल्हापूर), हुजेफा मुल्ला (कोल्हापूर), समर्थ पाटील (कोल्हापूर),17 वर्षे मुली: श्रावणी घोडेस्वार (कोल्हापूर), श्रावणी होनमोरे (सांगली), अप्रोजा मकानदार (कोल्हापूर),19 वर्षे मुले: सोएब मुलाणी (सांगली), हर्षवर्धन बाबर (सांगली), ओम निकम (कोल्हापूर),19 वर्षे मुली: वैष्णवी पाटील (कोल्हापूर), भूमी पाटील (कोल्हापूर), प्रतिक्षा गडदे (सांगली).मास स्टार्ट प्रकार 14 वर्षे मुले: प्रणित चव्हाण (कोल्हापूर), हर्षद हराळे (सांगली), रुद्र सूर्यवंशी (सांगली),14 वर्षे मुली: लक्ष्मी बजयंत्री (सांगली), प्रतिक्षा पाटील (कोल्हापूर), माया काटे (सांगली),

17 वर्षे मुले: वरद शिंदे (सांगली), आर्यन मळगे (कोल्हापूर), ऋतुराज फिरिंगे (कोल्हापूर)

17 वर्षे मुली: प्राजक्ता सूर्यवंशी (सांगली), संध्या शिंदे ( कोल्हापूर), श्रावणी चव्हाण (कोल्हापूर)

19 वर्ष मुले: निहाल नदाफ (सांगली), उज्ज्वल ठाणेकर (कोल्हापूर), भूषण पाटील (कोल्हापूर)

19 वर्षे मुली सायली आरंडे (कोल्हापूर), सृष्टी कुंभोजे (इचलकरंजी), लक्ष्मी पाटील (कोल्हापूर)

 

 

Advertisement
Tags :
#cyclecontestkolhapursangali
Next Article