Dapoli Gas Supply Update | दापोलीत घरगुती गॅसचा साठा पुरेसा; 45 दिवसांच्या अंतराबाबत तहसीलदारांचे स्पष्टीकरण
05:49 PM Mar 12, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
दापोलीत कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा
Advertisement
दापोली : दापोली तालुक्यात गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये ४५ दिवसांचे अंतर दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र हा निर्णय तहसील प्रशासनाचा नसून गॅस कंपन्यांच्या डिफॉल्ट सिस्टीममुळे लागू झालेला असल्याची माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली.
तहसीलदार बोंबे यांनी सांगितले की, दापोलीत घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.
Advertisement
मात्र सध्या कमर्शियल (व्यावसायिक) गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून उपलब्ध सिलेंडर प्रामुख्याने रुग्णालये, पोषण आहार केंद्रे आदी अत्यावश्यक सेवांसाठी दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हॉटेल व इतर व्यावसायिकांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Advertisement