For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘चांगलं’ काम केल्याने कामावरून केले कमी

06:05 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘चांगलं’ काम केल्याने कामावरून केले कमी
Advertisement

सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया

Advertisement

जेव्हा तुम्ही नोकरी करत असता, तेव्हा तुमच्याकडून अधिकाधिक काम कमी वेळेत करून घेतले जात असते. अशाप्रकारच्या मेहनती लोकांना कंपनीत महत्त्व दिले जाते, तर कामात टाळाटाळ करणाऱ्या लोकांच्या नोकरीवर टांगती तलवार असते. परंतु एखाद्याने अत्यंत चांगले काम केल्याने त्याची नोकरी संकटात सापडल्याचे कळल्यावर काय म्हणाल?

सोशल मीडियावर एका महिलेने व्हिडिओ शेअर करत आपल्यासोबत अजब घटना घडल्याचे सांगितले आहे. ही महिला स्वत:चे काम अत्यंत जलदपणे आणि प्रभावीपणे करत होती. तिने स्वत:चे काम अत्यंत वेगाने संपविले म्हणून तिला कामावरून कमी करण्यात आले आहे. या घटनेविषयी कळल्यावर लोकांनी तिला दिलेला सल्ला अधिकच रंजक आहे.

Advertisement

गरजेपेक्षा अधिक काम

मी कामात तरबेज असल्याने कामावरून काढून टाकण्यात आले. मला एक प्रोजेक्ट सोपविण्यात आला होता, जो एप्रिलपर्यंत पूर्ण करायचा होता, परंतु मी तो त्वरित संपवून संबंधित डाटा सॉफ्टवेअरमध्ये लोड केला होता. माझी ही कृती बॉसला पसंत पडली नाही आणि त्याने मला कामावरून काढून टाकल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे.

इतके काम करायचे नसते...

या महिलेची पोस्ट पाहिल्यावर सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अधिक काम करायचे नसते असे एका युजरने म्हटले आहे. तर पुढील नोकरीत अधिक मेहनत कर, परंतु सर्वकाही मॅनेजरच करतोय असे भासव. नोकरी सुरक्षित राहिल असे एका अन्य युजरने नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.