For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोहा डायमंड लीग स्पर्धा लांबणीवर

06:31 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
दोहा डायमंड लीग स्पर्धा लांबणीवर
Advertisement

पश्चिम आशियातील तणावामुळे निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था, बेंगळूर

पश्चिम आशियामध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे, कतारची राजधानी दोहा येथे 8 मे रोजी नियोजित असलेली डायमंड लीग हंगामाची पहिली फेरी 19 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे आयोजकांनी बुधवारी सांगितले. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर तसेच इस्लामिक रिपब्लिक (इराणने) शेजारील राष्ट्रांवर क्षेपणास्त्रs डागून त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर, या देशात विस्कळीत झालेली ही आणखी एक मोठी क्रीडा स्पर्धा ठरली आहे.

Advertisement

खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या हितासाठी, ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. जर परिस्थिती अनुकूल ठरली, तर ही स्पर्धा आता 19 जून रोजी आयोजित केली जाईल, असे स्पर्धेच्या आयोजकांनी एका निवेदनात म्हटले आहे. जून महिन्यात दोहा येथील तापमान अधिक असण्याची शक्यता असल्याने ही स्पर्धा कतार स्पोर्ट्स क्लबमधून खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हलवण्यात येईल. हे स्टेडियम तापमान नियंत्रित आहे. कतार शर्यत आणि स्पोर्ट्स कार वर्ल्ड एन्ड्युरन्स चॅम्पियनशिपचा पहिला टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे तसेच दोहा येथे नियोजित असलेला स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील फिनालिसिमा फुटबॉल सामना रद्द करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.