For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोर्लेत हत्तीचा शेतकऱ्यावर हल्ला ; आक्रमक ग्रामस्थांनी वनविभाग कर्मचाऱ्यांची गाडी अडवली

12:54 PM Aug 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मोर्लेत हत्तीचा शेतकऱ्यावर हल्ला   आक्रमक ग्रामस्थांनी वनविभाग कर्मचाऱ्यांची गाडी अडवली
Advertisement

(साटेली भेडशी प्रतिनिधी)

Advertisement

दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे एका शेतकऱ्यावर नामदेव हत्तीने पाठलाग करत हल्ला केल्याची घटना शुक्रवारी उशिरा सायंकाळी घडली.या घटनेने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक होत गावात आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी अडवून ठेवली व जोपर्यंत वरीष्ठ अधिकारी गावात येत नाही तोपर्यंत येथून कर्मचाऱ्यांना माघारी सोडणार नाही असा इशाराच दिला.मोर्लेत दिवसाढवळ्या हत्ती वावरत असून शेती बागायतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कामाला शेतात जाणे जोखमीचे झालेले आहे.शुक्रवारी आपल्या काजू बागेत काम करत असताना शेतकरी नामदेव सुतार यांच्यावर हत्तीने हल्ला केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलगा काम करत होता. सुदैवाने नामदेव सुतार व कुटुंबीय या हल्ल्यातून वाचले. ही घटना वनविभागाला कळविल्यानंतर कर्मचारी दाखल झाले. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीचे लोकेशन चुकीच दाखविल्याने हा प्रकार घडला असा आरोप स्थानिकांनी केला.यावेळी उपसरपंच संतोष मोर्ये,माजी उपसरपंच पंकज गवस, माजी उपसरपंच नामदेव सुतार व स्थानिक शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.