90 मिनिटं काही करू नका, बक्षीस जिंका
एका देशात होते अनोखी स्पर्धा
सद्यकाळात एकीकडे प्रत्येकजण स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणांना चिकटून असतो, तर दक्षिण कोरियाने मोबाइल अॅडिक्शनपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी अनोखी पद्धत शोधून काढली आहे. दरवर्षी येथे एक अनोखी स्पर्धा होते, ज्याला ‘स्पेस आउट’ म्हटले जाते.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना 90 मिनिटांपर्यंत काही करायचे नसते. यात संभाषण, कुठलीच हालचाल तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करायचा नसतो. यादरम्यान स्पर्धकांना शांत बसून रहायचे असते आणि स्वत:च्या हृदयांच्या ठोक्यांना नियंत्रित करायचे असते.
असा ठरतो विजेता
स्पेस आउट स्पर्धेत हार्ट रेट मॉनिटरिंगच्या आधारावर विजेता निवडला जातो, ज्या स्पर्धकाचा हार्ट रेट सर्वाधिक स्थिर राहतो, तोच या स्पर्धेचा विजेता ठरतो. या आयोजनाचा उद्देश लोकांना तणावमुक्त करणे आणि त्यांना डिजिटल जगतापासून काहीसे दूर करणे आहे.
स्पर्धेचा उद्देश
सद्यकाळातील धकाधकीच्या जीवनात लोक काही क्षणांसाठी देखील स्वत:च्या फोनपासून दूर राहू शकत नाहीत, अशा स्थितीत ही स्पर्धा लोकांना ध्यान आणि शांततेची शक्ती शिकविण्याचे माध्यम ठरली आहे. या अनोख्या स्पर्धेची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच आता अशाप्रकारची स्पर्धा अन्य देशांमध्येही आयोजित करण्याची मागणी होत आहे.
कोरियात का भासली गरज?
दक्षिण कोरिया स्वत:च्या टफ वर्क कल्चरसाठी ओळखला जातो, जेथे विकसित देशांमध्ये सर्वात अधिक कामाचे तास दिसून येतात. 2023 मध्ये सरकारने साप्ताहिक कार्यकाळाची मर्यादा वाढवून 69 तास करण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि अखेर सरकारला स्वत:च्या निर्णयापासून मागे हटावे लागते. अशा स्थितीत स्थानिक कलाकार वू सूप यांनी जीवनाला एका दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन सुरू केले. 2014 मध्ये याची सुरुवात झाली, तेव्हापासून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. कोरियाच्या एका शासकीय सर्वेष्घ्णात 19-34 वयोगटातील युवांना सामील करण्यात आले, ज्यात दर तीन पैकी एक युवाने मागीलवर्षी बर्नआउटचा अनुभव घेतला होता. यामागील कारणांमध्ये कारकीर्दीवरून चिंता 37.6 टक्के, कामाचा अत्याधिक दबाव 21.1 टक्के, कामाबद्दल निराशा 14 टक्के आणि कामकाज तसेच जीवनादरम्यान असंतुलनाला 12.4 टक्के कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले.