महामार्गाचे रूंदीकरण नकोच!
भोम ग्रामसभेत ग्रामस्थांची खडाजंगी : मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तोडगा काढावा
वार्ताहर /माशेल
भोम-अडकोण पंचायतीची ग्रामसभा महामार्गाचे रूंदीकरणच्या विषयावरून दोन गटात झालेल्या प्रचंड खडांजगीत पोलीस बंदोबस्तात संपन्न झाली. ग्रामस्थांनी महामार्गाचे रूंदीकरण नकोच! अशी कडक भूमिका घेतली. याप्रश्नी पंचायत मंडळासह ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याशी बैठक घेण्याचा ठराव मान्य करण्यात आला. सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. काल रविवारी भोम पंचायतीसमोर झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांना संबोधित करताना सरपंच दामोदर नाईक म्हणाले महामार्गाचे रूंदीकरण नको असल्यास आम्ही पुर्ण पंचायत मंडळासह ग्रामस्थांचे शिष्टमंडळाचे गाऱ्हाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी मांडणार. बांधकाम खाते खुद्द मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे असल्याने केंद्र सरकारशीही पत्रव्यवहार करण्यासांबंधी सर्व समस्याचे निवारण ते निश्चित करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भोम येथे उ•ाणपूल नकोच असा पवित्रा विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी घेतला. यावेळी उपस्थितांनी सरपंचाना रस्ता रूंदीकरण झाल्यास घरांना धोका आहे. तसेच वेळप्रसंगी महामार्गासाठी जमीन हस्तांतरण प्रक्रियाही रद्द करण्याचे सुचविले. रस्त्याच्या मध्यभागातून रूंदीकरण केल्यास आमचा गाव पुर्णत: नष्ट होईल. ग्रामस्थांची घरेही भाटकारांच्या जमिनीत असल्याने त्याच्याकडे जमीनीचा मालकी हक्क नसल्यानेही पुढील प्रक्रीया रखडणार अशी धास्ती ग्रामस्थांनी घेतलेली आहे.
प्रश्नांचा भडीमार करून महिलांनी सरपंचाना आणले जेरीस
सरपंच दामोदर नाईक यांनी सांगितले की बांधकाम खात्यातर्फे रस्ता दुरूस्तीसाठी घरे पाडण्यात येणार नसल्याचे सांगितले. दोन गटात झालेल्या खडाजंगीत अनेकवेळा खटके उडत होते. सरपंचावर प्रश्नावर भडीमार सुरू होता. यावेळी गावातील महिलावर्गाचीही लक्षणीय उपस्थित होती. म्हार्दोळ पोलिसांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी दोन्ही गटातील ग्रामस्थांनी प्रश्नाचा भडीमार करून सरपंच दामोदर नाईक यांना जेरीस आणले.
जानेवारीत मैदानाचे लोकार्पण, बेकायदेशीर भंगारअ•dयावर कारवाई
युवकांसाठी सुसज्ज मैदानाची मागणी आजपर्यत पुर्णत्वास आलेली नाही. युवकांनी मैदानाचे काम कधी पुर्ण होणार असे प्रश्न उपस्थित करून पंचायत मंडळाच्या नाकीनऊ आणले. ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देताना सरपंच म्हणाले येत्या जानेवारीपर्यत मैदानाचे काम पुर्णत्वास येईल. पाडण्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा भंगारअ•s कसे उभे राहतात यावर चर्चा झाली. सर्व बेकायदेशीर भंगारअ•dयावर कारवाई करण्याचे सुचना ग्रामस्थांनी केली. बाणस्तारी येथे सुसज्ज माकेंट प्रकल्प उभारल्यानंतरही रस्त्dयाच्या कडेला बसणाऱ्या व्यापाऱ्यांचा प्रश्न मिटत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. वाहतूक कोंडीवर उपायाऐवजी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असल्याचे सांगितले. सोपो गोळा करणाऱ्यावर मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्यात येईल तसेच घरपट्टी विषयावर घरांचे फेरसर्वेक्षणानंतर हा निर्णय घेण्यात येईल असे सरपंचानी उत्तर देताना सांगितले. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंबंधीला नागरिकांनी सहकार्य करावे. कचरा सार्वजनिक ^ठिकाणी किंवा गटारात फेकू न देना थेट पंचायतीतर्फे गोळा करीत असलेल्याकडे सुपुर्द करावा असे आवाहन केले. यावेळी चर्चेत संजय नाईक, तुषार नाईक, राजेंद्र नाईक, सिद्धानंद नाईक, राजदीप नाईक यांनी सहभाग घेतला. उपसरपंच शैला नाईक, पंचसदस्य प्रतिमा गावकर, मिताली फडते, सोनू नाईक, सुनिल भोमकर, आजम खान उपस्थित होते.