For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शुक्रवारी मतदान नको !

06:49 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
शुक्रवारी मतदान नको
Advertisement

निवडणूक आयोगाला मुस्लीम संघटनांचे आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. यातील एक टप्प्याचे मतदान 26 एप्रिल रोजी असून त्यादिवशी शुक्रवार आहे. हे पाहता मुस्लीम संघटनांनी निवडणूक आयोगाला ही तारीख बदलण्याचे आवाहन केले आहे. इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल)  आणि केरळमधील एका मुस्लीम संघटनेने मुस्लीम समुदायासाठी सामूहिक प्रार्थनेच्या महत्त्वाचा दाखला देत 26 एप्रिल रोजीचे मतदान अन्य तारखेला घेण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

केरळमध्ये शुक्रवारी मतदान करविल्यास निवडणूक अधिकारी आणि मतदान एजंटांना असुविधा होणार आहे. शुक्रवारी मुस्लीम मशिदींमध्ये एकत्र येतात, या दिवशी केरळ आणि तामिळनाडूत मतदान करणे अवघड ठरणार आहे. आम्ही आमची असुविधा आयोगाच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे आययुएमएलचे केरळ महासचिव पीएमए सलाम यानी सांगितले आहे.

आययुएमएलसोबत केरळमधील एक प्रमुख मुस्लीम संघटना केरळ जमीयथुल उलमाने चिंता व्यक्त केली आहे. शुक्रवारी होणारे मतदान मतदार तसेच सेवेवर असलेल्या अधिकाऱ्यांसाठी आव्हाने निर्माण करणारे ठरेल आणि मतदानाची टक्केवारीही प्रभावित होऊ शकते असे संघटनेने म्हटले आहे संघटनेचे अध्यक्ष सैयद मुहम्मद जिफरी मुथुक्कोया आणि महासचिव अलीकुट्टी मुसलियार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून 26 एप्रिल रोजी होणारे मतदान स्थगित करण्याची विनंती केली आहे.

Advertisement
Tags :

.