For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एचएसआरपीप्रकरणी कोणतीच कारवाई करू नका

06:25 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
एचएसआरपीप्रकरणी  कोणतीच कारवाई करू नका
Advertisement

परिवहन खात्याची पोलिसांना सूचना : नोंदणीसाठी मिळाले आणखी तीन दिवस

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

वाहनांना एचएसआरपी (हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्याची मुदत रविवार 15 सप्टेंबर रोजी संपली आहे. दरम्यान, बुधवार दि. 18 सप्टेंबरपर्यंत वाहनधारकांवर कोणतीच कारवाई करू नका, अशी सूचना परिवहन खात्याने पोलिसांना केली आहे. खात्याच्या या सूचनेवरून नोंदणीसाठी वाहनधारकांना आणखी तीन दिवस मिळाले आहेत. 18 सप्टेंबर रोजी एचएसआरपी लागू करण्यासंबंधी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत वाहनधारकांवर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे परिवहन विभागाचे आयुक्त ए. एम. योगीश यांनी सांगितले. एचएसआरपी नंबर प्लेट्स न बसविलेल्या वाहनधारकांकडून सोमवारपासून दंड आकारण्यात येणार असल्याचे परिवहन खात्याने जाहीर केले होते. राज्य पोलीस विभाग, वाहतूक विभागानेही जुन्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर दंड आकारण्यास सुऊवात केली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता परिवहन खात्याने 3 दिवस कारवाई न करण्याच्या सूचना दिल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement

सुमारे 1.5 कोटी वाहनधारकांनी अद्याप हाय सिक्मयुरिटी नंबर प्लेट बसविलेल्या नाहीत. मुदतवाढीसाठी परिवहन मंत्री रामलिंगा रे•ाr यांची मंजुरी आवश्यक असल्याची माहिती परिवहन खात्यातील सूत्रांनी दिली आहे. अनेक वाहनधारकांनी नवीन नंबर प्लेटसाठी अर्ज केले आहेत. मात्र, ते वाहन विव्रेत्यांकडे न जाता त्यांच्या वाहनांना नवीन नंबर प्लेट लावत आहेत. त्यामुळे वाहन विव्रेत्यांकडे शेकडो नंबर प्लेट पडून आहेत. ते वाहनांना बसवल्यानंतरच एचएसआरपी प्रक्रिया पूर्ण होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एचएसआरपी अनिवार्य करून ऑगस्ट 2023 मध्ये अधिसूचना जारी करण्यात आली. सुऊवातीला 17 नोव्हेंबर 2023 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. संथ गतीने होत असलेल्या अंमलबजावणीमुळे परिवहन खात्याकडून तीनवेळा मुदत वाढवण्यात आली होती. परिवहन खात्याच्या आकडेवारीनुसार, राज्यातील दोन कोटी जुन्या वाहनांपैकी केवळ 26 टक्के वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट आहेत. वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद न मिळाल्यामुळे एचएसआरपीच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत यापूर्वी तीनवेळा वाढवण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.